मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024: कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग मतदारांची 'अशी' घेणार काळजी!

Lok Sabha Election 2024: कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग मतदारांची 'अशी' घेणार काळजी!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 28, 2024 10:46 AM IST

Election Commission of India: कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात उकाडा जाणवत आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात उकाडा जाणवत आहे. (HT_PRINT)

Mumbai Lok sabha Election: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात तापमानाचा (Maharashtra Weathe) पारा वाढताच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर पोहोचले आहे. राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण आरोग्य संबंधित आजाराशी झुंजत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदान केंद्रावर वैद्यकीय पथके तैनात ठेवणार असल्याची माहिती समोर आली.

ट्रेंडिंग न्यूज

snake eggs in ulwe : नवी मुंबईतील उलवे इथं बांधकामाच्या ठिकाणी सापडली सापाची ८१ अंडी, सर्पमित्रानं काय केलं पाहा!

महाष्ट्राच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

Uddhav thackeray: आमचे सरकार आल्यानंतर...; ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, जनतेला काय काय आश्वासन दिली?

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रात एकूण १३ ठिकाणी मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर अमरावती, नांदेड, परभणी, बुलढाणा, यवतमाळ वाशिम, अकोला, वर्धा आणि हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी (२६ एप्रिल २०२४) मतदान झाले.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच जागांवर ६३.७० टक्के मतदान झाले. तर, दुसऱ्या टप्प्यात आठ जागांवर ६२.७१ टक्के मतदान झाले.

Weather Updates: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मुंबईत मतदान कधी?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे २०२४ रोजी मुंबईसह धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे येथे मतदान होणार आहे. मुंबईमधील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात मतदानाचा कार्यक्रम पार पडेल.

नांदेडमध्ये मतदारानं कुऱ्हाडीनं ईव्हीएम मशीन फोडलं

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड येथील एका व्यक्तीने चक्क ईव्हीएम मशीन फोडले. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदानकेंद्रावर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मतदाराला ताब्यात घेतले. भैय्यासाहेब येडके असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

WhatsApp channel