मराठी बातम्या  /  elections  /  Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार? किती टप्प्यात होणार मतदान?; नवी अपडेट आली समोर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार? किती टप्प्यात होणार मतदान?; नवी अपडेट आली समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 05, 2024 03:34 PM IST

Lok Sabha Election 2024 Date : मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोग १४ किंवा १५ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करू शकते. तसेच यावेळीही सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार?
लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार?

Lok Sabha Elections 2024 Date : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. इंडिया आघाडी तसेच एनडीए आघाडीकडून संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) येत्या १४ किंवा १५ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024 ) घोषणा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच २०२४ च्या निवडणुकाही एकूण सात टप्प्यात होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होऊ शकतं. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या  तारखांची घोषणा होण्यापूर्वी अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. सत्तारुढ भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आम आदमी पार्टी,  समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा १३ मार्च रोजी झाली होती. तसेच त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू झाली होती. या तारखेपूर्वी यावेळी घोषणा होण्याची शक्यता नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आपली सत्ता राखण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली असून घटकपक्षांसोबत तडजोडी केल्या जात आहेत. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीनेही पाटण्यातील भव्य रॅलीमधून लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता नवी तारीख समोर आली असून १४ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 

जून २०२४ मध्ये १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरू  गेल्यावेळी २४ मे लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. ३० मे रोजी सरकारची स्थापना झाली होती. 

निवडणूक आयोगाच्या पथकाकडून देशभरातील तयारीचा आढावा घेतला जात आहे. पथक सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर हे पथक उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मिरचा दौरा करेल.  १३  मार्चपर्यंत हे पथक आपला दौरा पूर्ण करून निवडणूक आयुक्त सर्व राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून लोकसभा निवडणुकांची घोषणा करतील. 

WhatsApp channel