लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसची सोथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हातात घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. पारवे यांच्या प्रवेशानंतर त्यांना शिंदे गटाकडून रामटेकमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. रामटेकमधून कृपाल तुमाने यांनी दोन वेळा विजय मिळवला आहे.
रामटेक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार ठरवताना मोठा ड्राम पाहायला मिळाला. गेल्या दोन टर्मपासूनचे शिवसेनेचे खासदार राहिलेले कृपाल तुमाने यांना उमेदवारी न दिल्याने ही जागा भाजपला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आताशिंदे गट रामटेकसाठी आग्रही असून त्यांनी त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. शिवसेनेने तुमाने यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आयातकेले आहे. आमदार पारवे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा पाठविला आहे.पारवे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर रामटेकमध्ये त्यांची लढत काँग्रेसच्या रश्मी बर्वेयांच्याशी होईल.
रामटेकच्या लोकसभा जागेवरून महायुतीत पेच निर्माण झाला होता. भाजप तसेच शिंदे गटानेही रामटेकच्या जागेवर दावा केला होता. रामटेकमधील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याबद्दल अहवाल चांगला नाही, त्यामुळे येथे पर्यायी उमेदवार शोधण्याचे भाजपने शिंदे यांना सांगितले होते. त्यानुसार आता शिंदें गटाकडून उमेदवाराचा शोध संपला आहे. पारवे यांना शिवसेनेकडून रामटेकमधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
२०१४ मध्ये आमदार राजू पारवे यांनी उमरेडमधून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपचे सुधीर पारवे यांचा जवळपास १८ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता. उमरेडमध्ये दोन पारवे मध्येच सामना होता. आता राजू राजू पारवे यांना महायुतीत घेत सुधीर पारवे यांचा रस्ता मोकळा केला आहे.
संबंधित बातम्या