Nana Patole: अकोला भाजप खासदारांचे व्हेंटिलेटर निवडणुकीत केव्हाही काढतील; नाना पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Nana Patole: अकोला भाजप खासदारांचे व्हेंटिलेटर निवडणुकीत केव्हाही काढतील; नाना पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

Nana Patole: अकोला भाजप खासदारांचे व्हेंटिलेटर निवडणुकीत केव्हाही काढतील; नाना पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

Published Apr 05, 2024 08:08 PM IST

Nana Patole Controversial statement: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Nana Patole On Sanjay Dhotre: काँग्रेस उमेदवार डॉ.अभय पाटील (Abhay Patil) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित प्रचार रॅलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर आहे, त्यांचे व्हेंटिलेटर केव्हा काढतील माहिती नाही. पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून थेट राज्यात वाद पेटला आहे.

Amravati Lok sabha : अमरावतीत १७ रुपयांच्या साडीची का होतेय चर्चा? काय आहे प्रकरण? वाचा

अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे काही वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आणि घरीच एका गंभीर आजारावर संजय धोत्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकासाठी भाजने संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, डॉ.अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित प्रचार रॅलीत नाना पटोले यांनी संजय धोत्रे नाव न घेता भाजपवपर निशाणा साधला आहे. अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर आहे.निवडणुका लागल्यानंतर किंवा मतदानाच्या आधी त्यांचे व्हेंटिलेटर केव्हाही निघू शकते. ते त्यांच्या मनावर आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.नाना पटोले यांच्या आरोपाने अकोल्यासह राज्यात खळबळ माजली आहे. या टीकेमुळे पटोले टीकेचे धनी झाले आहेत. यावरुन भाजपनं देखील पटोले यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.

Sanjay Nirupam: काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर संजय निरुपम यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले? वाचा

चंद्रशेखर बावनकुळे यांचे जोरदार प्रत्युत्तर

नाना पटोले यांच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. परंतु, त्यांच्याबद्दल अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या मनाला वेदना पोहोचवल्या आहेत. जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मते मिळवण्यासाठी गिधाडांच्या वृतींने वागू नका

पुढे बावनकुळे म्हणाले की, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही. भाजपविरोधात कितीही खोटा प्रचार करा, मत मिळवण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण घाणेरडे राजकारण करू नका. एखाद्याच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणे गिधाडांची वृत्ती असते. मते मिळवण्यासाठी गिधाडांच्या वृतींने वागू नका, अशा शब्दात बावनकुळेंनी नाना पटोले यांचा समाचार घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग