मराठी बातम्या  /  elections  /  Congress Candidates List : काँग्रेसच्या चौथ्या यादीत महाराष्ट्रातून ४ उमेदवारांची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी?

Congress Candidates List : काँग्रेसच्या चौथ्या यादीत महाराष्ट्रातून ४ उमेदवारांची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 23, 2024 11:54 PM IST

Congress Candidates List : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जारी केलेल्या उमेदवारांच्या चौथ्या यादीत महाराष्ट्रातील ४ नावांची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर
काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabhaelection2024) काँग्रेसने आपली चौथी उमेदवार यादी (Congress Candidates List) जारी केली आहे. काँग्रेसने आपल्या या चौथ्या यादीत एकूण ४६ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सह अन्य राज्यातील मतदारसंघांचा समावेश आहे. या लिस्टनुसार पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून काँग्रेसचे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय मैदानात उतरतील.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच वंचितबाबतही मविआमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित करून आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जारी केलेल्या उमेदवारांच्या चौथ्या यादीत महाराष्ट्रातील ४ नावांची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रामधील नागपूर, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना संधी दिली आहे. तसेच नागपूर येथून नितीन गडकरींच्या विरोधात विकास ठाकरे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान आणि गोंदिया- भंडारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोले यांना संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसने आपल्या तिसऱ्या यादीत महाष्ट्रातील ७ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात नंदूरबारमधून जी. के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली होती.

WhatsApp channel