काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या आधी महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नारी न्याय गॅरंटी योजनेच्या माध्यमातून पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. काँग्रेसने सत्तेत आल्यास नारी न्याय गारंटी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने गरीब महिलाओं, आशा, आंगणवाडी सेविका, मीड डे मील वर्कर्स यांच्यासोबतच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही योजना बनवली आहे. त्याचबरोबर गावातील महिलांमध्ये कायद्याबाबत जागरुकता होण्यासाठी महिला मैत्रीची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, महिला देशाची निम्मी लोकसंख्या आहे. मात्र त्यांना गेल्या १० वर्षात काहीच मिळाले नाही. त्यांच्या नावावर केवळ राजकारण झाले व त्यांची मते मिळवली गेली. कांग्रेस आज 'नारी न्याय गॅरेंटी' ची घोषणा करत आहे.