महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून आज संपूर्ण जागावाटप जाहीर केले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक व सातारा लोकसभा मतदारसंघावरून निर्माण झालेला तिढाही सुटला आहे. राष्ट्रवादीने साताऱ्याची जागा उदयनराजेंसाठी भाजपला सोडून नाशिकची जागा मिळवली आहे. नाशिकमधून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची नाशिकमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत या जागेवरून कलह वाढला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत धाव घेत ही जागा आपल्याला सोडण्याची मागणी केली होती. त्यातच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व मनसेनेही नाशिकच्या नावेवर दावा ठोकला होता. त्यामुळे ही जागा कुणाला सुटणार, याची उत्सुकता होती. अखेर याता राष्ट्रवादीची सरशी झाली असून छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे पक्कं झालं आहे.
महायुतीतील दोन जागांचा पेच निर्माण झाला होता. साताऱ्यात अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्यास उदयनराजे यांनी नकार दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने साताऱ्याची जागा सोडून नाशिकची जागा पदरात पाडून घेतली आहे. आता साताऱ्यातून उदयनराजे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर त्यांच्या शिल्लक राहिलेल्या दोन वर्षासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर पाठवला जाणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांनी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबई गाठून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्याआधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेच असतील अशी घोषणा केली होती. त्यानंतर मोठी ट्विस्ट निर्माण होत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे.
संबंधित बातम्या