आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election 2024 ) भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पहिली यादी (bjp candidate list) जाहीर केली आहे. भाजपने पक्षाच्या ३४ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर (pragya singh thakur) नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. तुमचे तिकीट का कापले? या प्रश्नावर त्यांनी म्हटले की, मी अशा काही शब्दांचा वापर केला आहे, कदाचित ते मोदीजींना पसंत आले नसावेत.
भाजपने शनिवारी १९५ उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर केली होती. भोपाळ मतदारसंघातून यावेळी आलोक शर्मा यांनी तिकीट दिले आहे. पक्षाने मध्य प्रदेशमधील २९ जागांपैकी २४ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातील दोन विद्यमान खासदार भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर आणि गुना येथून केपी शर्मा यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढतील.
प्रज्ञा ठाकूर यांना विचारले गेले की, अखेर पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकासाठी त्यांना तिकीट का दिले नाही? त्यांनी सांगितले की, हा पक्षाचा निर्णय आहे. यामध्ये याचा विचार करू नये की, तिकीट का दिले नाही, कशामुळे तिकीट कापले. मी आधीही तिकीट मागितले नव्हते व आताही मागणार नाही.
प्रज्ञा ठाकूर यांच्यावर पंतप्रधान मोदी नाराज होते. त्यांनी महात्मा गांधी यांचे खुनी नथूराम गोडसे याला खरा देशभक्त म्हटले होते. यावर मोदी म्हणाले की, ते प्रज्ञा ठाकूरला कधीही माफ करणार नाहीत. मोदी म्हणाले होते की, गोडसेविषयीच्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागितली आहे, मात्र महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला मी कधीही माफ करू शकणार नाही.
यावर प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, होऊ शकते की, मी अशा काही शब्दाचा वापर केला, जे मोदींना पसंत आले नाहीत. त्यांनी म्हटले होते की, मला माफ करणार नाहीत. मात्र मी त्यासाठी आधीच माफी मागितली होती. माझे सत्या बोलणे विरोधक व काँग्रेसला खटकते व ते माझ्या आडून मोदींवर प्रहार करतात.
संबंधित बातम्या