मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Kolhapur Lok Sabha Constituency: कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आघाडीवर; मात्र तरी संजय मंडलिक यांना विजयाची अपेक्षा

Kolhapur Lok Sabha Constituency: कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आघाडीवर; मात्र तरी संजय मंडलिक यांना विजयाची अपेक्षा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 04, 2024 11:34 AM IST

Kolhapur Lok Sabha Constituency: मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी उत्तम मतांची आघाडी घेतली आहे.

कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आघाडीवर; मात्र तरी संजय मंडलिक यांना विजयाची अपेक्षा
कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आघाडीवर; मात्र तरी संजय मंडलिक यांना विजयाची अपेक्षा

Kolhapur Lok Sabha 2024 Constituency: आज सगळ्यांचेच लक्ष लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालाकडे लागले आहे. प्रत्येक पक्षामध्ये चुरशीचा लढा सुरू आहे. घटकेत कुणी आघाडीवर, तर घटकेत कुणी पिछाडीवर जाताना दिसत आहे. कोल्हापुरातही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये विजयासाठी चुरस रंगलेली दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार शाहू महाराज छत्रपती आहेत. तर, भाजपकडून खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी उत्तम मतांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी कायम ठेवत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Election Results 2024 Live Updates : राज्यात महाविकास आघाडीचा महायुतीला दणका, ४८ पैकी २७ जागांवर आघाडी

कोल्हापुरात मत मोजणीच्या पाचव्या फेरीत देखील शाहू महाराज छत्रपतींची आघाडी असताना ही भाजपचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आपणच निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान खासदार संजय मंडलिक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘पहिल्या फेरीत पिछाडीवर असलो, तरी मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि निश्चित पुढच्या काही फेरीत माझ्या मतांच्या आघाडी दिसेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दरम्यान पाचव्या फेरीची मतमोजणी देखील पार पडली असून, यातही शाहू महाराज छत्रपतींनी १५००० मतांनी मंडलिकांपेक्षा आघाडी घेतली आहे.

Beed Lok Sabha Constituency Result: बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर; बजरंग सोनवणे ८ हजार ९६५ मतांनी आघाडीवर

मला विजय नक्की मिळेल: संजय मंडलिक

आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये शाहू महाराज छत्रपती, संजय मंडलिकांपेक्षा काही हजार मतांनी नेहमीच आघाडीवर राहिलेले दिसले आहेत. याविषयी बोलताना संजय मंडलिक म्हणाले की, ‘मतमोजणीच्या एकूण ३२ फेऱ्या पार पडणार असून, पहिला काही फेऱ्यांमध्ये मी पिछाडीवर असलो, तरी पुढील काही फेऱ्यांमध्ये मला नक्कीच आघाडी मिळू शकते.’

शाहू महाराज छत्रपती आघाडीवर

कागल आणि चंदगड या भागांतून आपल्याला मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती हे सकाळपासूनच आघाडीवर दिसत आहे. मात्र कागल येथे त्यांना संजय मंडलिक यांच्या पेक्षा १८७० मतं कमी मिळाल्याचे चित्र दिसले आहे. याचाच अर्थ कागल आणि चंदगडवासियांवर संजय मंडलिक यांनी दाखवलेला विश्वास खरा ठरत आहे. मात्र, सध्या मतमोजणीची पाचवी फेरी पार पडली असून, शाहू महाराज छत्रपतींनी संजय मंडलिकांपेक्षा १५००० मतांनी आघाडी घेतली आहे.

WhatsApp channel