मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Kanhaiya Kumar: प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर हल्ला; पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने कानशिलात लगावली!

Kanhaiya Kumar: प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर हल्ला; पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने कानशिलात लगावली!

May 17, 2024 10:29 PM IST

Kanhaiya Kumar attacked: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला.

प्रचारदरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला.
प्रचारदरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला.

Kanhaiya Kumar News: लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) प्रचारादरम्यान ईशान्य दिल्लीतील काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar Viral Video) यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने त्यांच्या कानशिलात लगावली. यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. ही घटना ईशान्य दिल्लीतील उस्मानपूर पोलीस स्टेशन परिसरातील करतार नगरमध्ये घडली.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण कन्हैया कुमारच्या जवळ येतो आणि आधी त्याला पुष्पहार घालतो, त्यानंतर तो कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लगावतो. मात्र, कन्हैया कुमारच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला लगेच पकडले. ईशान्य दिल्ली मतदारसंघातून काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकचा उमेदवार कन्हैया कुमार आहे. तर, भाजपने या जागेवरून मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. २५ मे २०२४ रोजी दिल्लीतील सर्व सात जागांवर मतदान होणार आहे.

हा देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांचेही असेच होईल

हा देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांचेही असेच होईल, असे कन्हैया कुमारच्या कानशिलात लगावणारा तरुण म्हणाला. तसेच आम्ही भारतीय लष्कराच्या अपमानाचा बदला घेतला. कन्हैयाने संपूर्ण देशाच्या भावना दुखावल्या आहेत. आज आम्ही त्याचा बदला घेतला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचा नाही हे सांगू इच्छितो, असेही तरुणाने सांगितले.

खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली

यापूर्वी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डीके शिवकुमार यांनी खांद्यावर हात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी शिवकुमार यांना खडेबोल सुनावले. कर्नाटकात डीके शिवकुमार हे 'डीके' म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवकुमार हे शनिवारी हावेरी येथील सावनूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी गेले असताना ही घटना घडली. मनपा सदस्य अलाउद्दीन मणियार यांनी काँग्रेस नेते शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे दिसत आहे. मात्र, ही गोष्ट शिवकुमार यांना खटकली

WhatsApp channel