Prajwal Revanna: देशातील पहिला निकाल समोर; माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव-jdu leader prajwal revanna defeat from karnatakas hassan constituency ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Prajwal Revanna: देशातील पहिला निकाल समोर; माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

Prajwal Revanna: देशातील पहिला निकाल समोर; माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

Jun 04, 2024 01:43 PM IST

Prajwal Revanna Defeat from Karnatakas Hassan constituency: कर्नाटकातील हासन मतदारसंघातून जेडीयूचे नेते प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे.

कर्नाटकातील हासन मतदारसंघातून जनता दल सेक्युलरचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना पराभूत
कर्नाटकातील हासन मतदारसंघातून जनता दल सेक्युलरचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना पराभूत

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला असून कर्नाटकातील हासन मतदारसंघातून जनता दल सेक्युलरचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे.

मतमोजणीच्या सोळाव्या फेरीनंतर निकाल श्रेयस पटेल यांच्या बाजूने लागला, जे सुरुवातीपासूनच आघडीवर होते. श्रेयस पटेल यांनी ४१ हजार ७८२ मतांनी रेवण्णा यांना पराभूत केले. श्रेयस पटेल यांना ६ लाख १२ हजार ४४८ मतं मिळाली. तर, रेवण्णा यांना ५ लाख ७० हजार ६६६ मतं मिळाली.

२०१९ च्या निवडणुकीत जेडीएसने कर्नाटकात हसन मतदारसंघातून एकमेव जागा जिंकली होती. रेवण्णा यांनी भाजपच्या मंजू यांचा १ लाख ४१ हजार २२४ मतांनी पराभव केला. रेवण्णा यांना ६ लाख ७६ हजार ६०६ आणि मंजू यांना ५ लाख ३५ हजार ३८२ मते मिळाली.

हसन लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. पुढे तो देवेगौडा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९९९ च्या लोकसभेची निवडणूक वगळता देवेगौडा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी १९९१ ते २०१९ पर्यंत ही जागा जिंकली. एकट्या देवेगौडा यांनी ही लोकसभेची जागा ५ वेळा जिंकली. जनता दलाच्या तिकिटावर दोनदा आणि जेडीएसच्या तिकिटावर तीनदा निवडणूक जिंकण्यात ते यशस्वी ठरले.

प्रज्वल रेवण्णाविरोधात लैंगिक छळाची तक्रार

प्रज्वल रेवण्णा यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती. यानंतर सिद्धरामय्या यांच्या सरकारने एसआयटी तपासाचे आदेश दिले आणि एक टीम तयार केली. रेवण्णा यांच्यावर बलात्कार, विनयभंग, ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याच्या आरोपांसह तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. रेवण्णाने ५० हून अधिक महिलांचा लैंगिक छळ केल्याचे एसआयटीने तपासात उघड झाले. यामध्ये २२ ते ६१ वर्षे वयोगटातील महिलांचा समावेश आहे.

बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावरून अटक

कर्नाटकातील सेक्स स्कँडलमधील आरोपी प्रज्वल रेवण्णा यांनी २७ मे रोजी एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणाले की, "मी ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. माझा न्यायालयावर विश्वास आहे. मला विश्वास आहे की, कोर्टातून न्याय मिळवून खोट्या प्रकरणातून बाहेर पडेल." ३१ मे रोजी रात्री उशिरा विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर उतरल्यानंतर एसआयटीने रेवण्णा यांना ताब्यात घेतले.