Internal Strife in mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपावरून धूसफूस सुरू झाली. काही जागांवरील वाद अजूनही सुटला नसल्याचे दिसून येत आहे. आता महाआघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. अनिल देसाई चेंबूर परिसरातील पांजर पोळ परिसरात प्रचारासाठी आले असता त्यांना स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. यामुळे प्रचार न करताच देसाईंना माघारी परतावं लागलं.
महाविकास आघीडीतील घटक पक्ष काँग्रेस व ठाकरे गटांतर्गतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चेंबूरमधील पांजर पोळ परिसरात ठाकरे गटाचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांची प्रचार सभा होणार होती. मात्र ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वादामुळे अनिल देसाईंना प्रचार न करता माघारी फिरावं लागलं.(anil desai walked back without election campaigning) दक्षिण-मध्य मुंबई हा मुंबईतील सर्वात लक्षवेधी मतदारसंघ आहे. येथे शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटात लढत होत आहे. येथे शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई या दोघांमध्येसामना आहे.
मुंबईत (Lok sabha elections 2024 ) पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचार करण्यात येत आहे. मात्र आज अनिल देसाई यांना प्रचार करतानामित्र पक्षातील कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
चेंबूरमधील काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुढे आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी देसाईना तेथून निघून जाण्यास सांगितले गेले.
मुंबईतील सहा मतदारसंघात सोमवारी २० मे रोजी मतदान होणार आहे. येथील दक्षिण-मध्य मतदारसंघात अनिल देसाई व शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यात लढत आहे. तर उत्तर मध्य मुंबईत मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.
संबंधित बातम्या