मराठी बातम्या  /  elections  /  Hatkanangle Lok Sabha : हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात ठाकरेंचा शिवसैनिक रिंगणात; कोण आहेत सत्यजीत पाटील सरुडकर?

Hatkanangle Lok Sabha : हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात ठाकरेंचा शिवसैनिक रिंगणात; कोण आहेत सत्यजीत पाटील सरुडकर?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 03, 2024 07:33 PM IST

Hatkanangale Lok Sabha : हातकणंगलेतून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना राजू शेट्टीविरोधात मैदानात उतरवले आहे. त्यामुळे येथे दोन्ही शिवसेना , वंचित व स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जाणून घेऊन कोण आहेत ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील

कोण आहेत सत्यजीत पाटील?
कोण आहेत सत्यजीत पाटील?

Hatkanangle Lok Sabha constituency : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) उमेदवार देणार नाही व स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना समर्थन देईल, अशी चर्चा सुरू असतानाच आता ठाकरे गटाकडून हातकणंगले मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. हातकणंगलेतून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना राजू शेट्टीविरोधात मैदानात उतरवले आहे. त्यामुळे येथे दोन्ही शिवसेना , वंचित व स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. मात्र ठाकरे गटाने त्यांच्यासमोर अट ठेवली होती की, महाविकास आघाडीत सामील व्हावं आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी. मात्र शेट्टी यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्यास नकार दिल्याने ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना मैदानात उतरवले गेले. हातकणंगलेत शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, तरवंचितकडून डी. सी. पाटील मैदानात आहेत.

शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करून राजू शेट्टी यांना मोठा धक्का दिला दिला आहे.

हातणंगले मतदारसंघातून लोकसभेसाठी इचलकरंजीचे माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सत्यजित पाटील सरूडकर यांच्यात चुरस होती. अखेर उमेदवारी मिळवण्यात सत्यजित पाटलांनी बाजी मारली आहे. सत्यजीत पाटील यांच्या उमेदवारीमुळे शाहूवाडी तालुक्याला पुन्हा एकदा खासदारकीचं तिकीट मिळालं आहे.

कोण आहेत सत्यजीत पाटील-सरुडकर?

हातकणंगलेच्या मैदानात उतरलेले सत्यजित सरूडकर (Satyajeet patil) शिवसेना ठाकरे गटाचे व ठाकरे घाराण्याचे निष्ठावंत शिवसैनिक समजले जातात. सरुडकर यांनी शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. २००४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ते एकमेव शिवसेनेचे आमदार होते. २०१४ मध्येही ते विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभेत विनय कोरे यांनी त्यांचा पराभव केला होते.मध्ये कोल्हापूरमध्ये ते एकमेव सेना आमदार होते.

शाहूवाडी तालुक्यात सरूडकर पाटील घराण्याचा मोठा प्रभाव आहे. बाबासाहेब पाटील सरूडकर शाहूवाडीतून दोन वेळा विधानसभेत गेले होते. त्यांनी माजी आमदार संजय सिंह गायकवाड यांचा पराभव केला होता. बाबासाहेब पाटील सरूडकर हे शिराळा तालुक्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे २५ वर्षापासून उपाध्यक्ष आहेत. त्यांचा राजकीय वारसा सत्यजित पाटील सरूडकर चालवत आहेत.

त्यांनी २००४ मध्ये मानसिंग गायकवाड व करण गायकवाड यांचा तर २०१४ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती.

WhatsApp channel