लोकसभा निवडणुकीतील चार टप्पे पार पडले असून आता पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. असून मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत.पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी राजकीय नेत्यांकडून प्रचासभांचा धडाका सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या दिंडोरीत सभा घेतली. दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मोदींनी ही सभा घेतली. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर जोर टीका केली. मात्र शेतकऱ्यांनी सभेत जोरदार घोषणाबाजी केली. शेककऱ्यांनी कांदाप्रश्नी चर्चा करण्याची मागणी करत पंतप्रधानांना कांदे दाखवले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोदींच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत त्यांना कांदे दाखवले व कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी केली. आंदोलनकांनी पंतप्रधान मोदींना कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढले. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. मोदींना आपले भाषण काही वेळ थांबवावे लागले.
नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हणत या दोन्ही पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण पक्के असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतनंतर हे दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेसची अशी अवस्था होईल की, त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही मिळणार नाही. त्यामुळे हे छोटे-मोठे पक्ष आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलिन होतील व विरोधी पदाचा दावा ठोकतील. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकाच्या भाषणात केला आहे.
मोदी म्हणाले महाराष्ट्रातील एका नेत्यांने दावा केला आहे की, निवडणूक संपताच लहान पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील. नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण येईल ती बाळासाहेब ठाकरेंची. कारण बाळासाहेब म्हणायचे ज्या दिवशी शिवसेनेची काँग्रेस होताना दिसेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. आता नकली शिवसेनेचं अस्तित्त्वच संपणार आहे.
नकली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंची स्वप्नं धुळीला मिळवली. बाळासाहेबांची इच्छा होती की, अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जावं, काश्मीरमधील कलम ३७० मागे घेतलं जावं, बाळासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. मात्र नकली शिवसेनेला याचा राग येत आहे
संबंधित बातम्या