Kangana Ranaut : कंगना राणावत विरोधात ८ गुन्हे नोंद, तरीही का दिलं तिकीट?; भाजपने दिलं उत्तर-eight people including javed akhtar have filed case against kangana ranaut why bjp give her ticket from mandi ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Kangana Ranaut : कंगना राणावत विरोधात ८ गुन्हे नोंद, तरीही का दिलं तिकीट?; भाजपने दिलं उत्तर

Kangana Ranaut : कंगना राणावत विरोधात ८ गुन्हे नोंद, तरीही का दिलं तिकीट?; भाजपने दिलं उत्तर

Mar 28, 2024 09:27 PM IST

Kangana Ranaut News : मानहानी, कॉपीराईट प्रकरणासह ८ गुन्हे कंगनाविरोधात नोंद आहेत. त्याचसोबत भाजपने सी-७फॉर्ममध्ये कंगनाला उमेदवारी देण्याबाबतचे कारण सांगितले आहे.

कंगनाला उमेदवारी देण्याचं भाजपनं कारण केलं स्पष्ट
कंगनाला उमेदवारी देण्याचं भाजपनं कारण केलं स्पष्ट

लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने प्रसिद्ध  अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. अभिनेत्री कंगनाच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात ८ गुन्हे नोंद आहेत. ही माहिती भाजपनेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरून दिली आहे. यातील अधिकांश गुन्हे मुंबईतील पोलीस ठाण्यात नोंद आहेत. कंगनाविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनीही केस दाखल केली आहे. तिच्यावर कॉपीराइटचा खटलाही चालू आहे.

Govinda news : गोविंदाचे दाऊद इब्राहिमशी संबंध…; भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं 'ते' वक्तव्य पुन्हा व्हायरल
अभिनेत्री कंगना राणावतला 'क्वीन' आणि 'पंगा गर्ल' नावाने ओळखले जाते. वादाशी तिचे घनिष्ठ नाते आहे. त्यामुळे तिच्याविरोधात मानहानीसह शेतकरी आंदोलनवर कमेंट केल्याप्रकरणी तसेच अन्य प्रकरणात ८ गुन्हे नोंद आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार निवडणूक आयोगाच्या गाइडलाइननुसार उमेदवाराला सी-७ फॉर्ममध्ये आपली माहिती द्यावी लागलेत. त्याचबरोबर दोन वृत्तपत्रातही याची जाहिरात द्यावी लागते.

भाजपाने सांगितले उमेदवारी देण्याचे कारण - 
मानहानीच्या प्रकरणासह ८ गुन्हे कंगनाविरोधात नोंद आहेत. त्याचसोबत भाजपने सी-७ फॉर्ममध्ये कंगनाला उमेदवारी देण्याबाबतचे कारण सांगितले आहे. त्यामध्ये त्यांनी कंगनाला सामाजिक कार्यकर्ती तसेच तरुणांचे प्रेरणास्थान म्हटले आहे. मंडीमधून कंगनाला तिकीट दिल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी तिच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी खुलासा केला की, अन्य कोणीतरी त्यांच्या हँडलवरून ही पोस्ट केली होती.

कोण-कोणते गुन्ह आहेत नोंद?
पहिली केस गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीची केली आहे. जी केस मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात नोंद आहे. दुसरे प्रकरण आशीष कौल यांनी मुंबईतील वांद्रेमध्ये कंगनावर कॉपीराइटची केस केली आहे. तिसरा गुन्हा वांद्रेमध्येच नोंद आहे. चौथे प्रकरण पंजाबमधील बठिंडा येथे महिला शेतकरी महिंद्र कौर यांनी मानहानीची केस ठोकली आहे. पाचवी केस जरीना वहाबने दाखल केली आहे. सहावे प्रकरण आदित्य पंचोलीने दाखल केला आहे. सातवा गुन्हा कर्नाटक हायकोर्टात रमेश नायक यांनी नोंदवला आहे. आठवे प्रकरण मुंबई हायकोर्ट अंतर्गत सत्र न्यायालय दिंडोशी येथे नोंद आहे.