मराठी बातम्या  /  elections  /  Congress Candidates List: राहुल गांधी वायनाडमधून लढणार, लोकसभेसाठी काँग्रेसकडून ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Congress Candidates List: राहुल गांधी वायनाडमधून लढणार, लोकसभेसाठी काँग्रेसकडून ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 08, 2024 08:00 PM IST

Congress Candidates List : लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राहुल गांधी वायनाडमधून लढणार असून अमेठीचा सस्पेन्स कायम आहे.

राहुल गांधी वायनाडमधून लढणार
राहुल गांधी वायनाडमधून लढणार

Congress List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) काँग्रेसने आज (शुक्रवार) उमेदवारांची पहिली यादी (Congress Candidates List) जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी, भूपेश बघेल यांच्यासह ३९ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरतील. यूपीमधील अमेठी जागेवर अजूनही सस्पेंस कायम आहे. निवडणूक समितीच्या बैठकीत अजून यूपीमधील जागा निश्चित झालेल्या नाहीत. त्याचबरोबर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना छत्तीसगडमधील राजनांदगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाकडून उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ३९ उमेदवांची नावे जाहीर केली. या यादीत काँग्रेसने एकूण ८ राज्यांतील ३९ उमेदवांची यादी जाहीर केली. यातसर्वाधिक नावेकेरळमधीलअसून येथे १५ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील प्रत्येकी ६ नावे, तेलंगणातील ४ मेघालयातील २आणि त्रिपुरा, सिक्कीम आणि नागालँडमधील प्रत्येकी एका उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहेत.  

काँग्रेसने सामान्य वर्गातील १५ उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं असून २४ उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील आहेत.काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत १२ उमेदवार ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर ८ उमेदवार ५०-६० वयोगटातील आहेत. १२ लोक ६१-७० वयोगटातील आहेत. तर ७ उमेदवार हे ७१-७६ वयातील आहेत.

 

कोणा-कोणाला मिळाली संधी?

भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तिरुअनंतपुरममधून शशी थरूर आणि बंगळुरू ग्रामीणमधून डीके शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश यांना संधी देण्यातआली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमधील जागापाटपाची चर्चा सुरू असून अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जोपर्यंत जागावाटपावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत काँग्रेसकडूनही महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा होणार नसल्याचं स्पष्ट आहे.

WhatsApp channel