मराठी बातम्या  /  elections  /  मोठी बातमी ! चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी, शिवानी वडेट्टीवार यांचा पत्ता कट

मोठी बातमी ! चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी, शिवानी वडेट्टीवार यांचा पत्ता कट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 24, 2024 09:15 PM IST

Pratibha Dhanorkar : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी
चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी

ओबीसीबहुल चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रतिभा धोनारकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर व प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यात स्पर्धा सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी शिवानी वडेट्टीवार यांचा पत्ता कट करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाचवी उमेदवार यादी जाहीर केली असून काँग्रेसकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाचव्या यादीमध्ये तीन उमेदवारांना लोकसभेचं तिकीट देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एक आणि राजस्थानमधील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिभा धानोरकर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला एकमेव खासदार बाळू धानोरकरांच्या रुपात मिळाला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. बाळू धानोरकरांच्या मृत्यूनंतर नैसर्गिक न्यायाप्रमाणे आपल्यालाच उमेदवारी मिळावी,असा दावा प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केला होता. दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे.

शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारीसाठी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासर काँग्रेस नेते जयराम रमेश,खासदार मुकुल वासनिक यांच्यासह अनेकांच्या भेटी घेतल्या होत्या. तर प्रतिभा धानोरकर यांनी तीन दिवसापूर्वी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघावर दावा केला होता.

WhatsApp channel