मराठी बातम्या  /  elections  /  Congress On BJP: भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा काँग्रेसचा आरोप, नेमके प्रकरण काय?

Congress On BJP: भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा काँग्रेसचा आरोप, नेमके प्रकरण काय?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 28, 2024 06:52 PM IST

Atul Londhe On Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे.

भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.
भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.

Loksabha Election 2024: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागल्याचा दावा करत न्यायालयाच अवमान केला आहे. बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्याविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.

lok sabha election : मुंबईतील डॉक्टर, नर्सेसना निवडणूक ड्युटी; विरोध होताच प्रशासनाचे घूमजाव

यासंदर्भात अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. "भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा जात प्रमाणपत्रप्रकरणाचा निकाल दिला आहे, असा चुकीचा आणि दिशाभूल करणारा दावा केला आहे. जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे विधान करून खोटी माहिती पसरवली जात आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असून हा भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा आहे, असे अतुल लोंढे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे."

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून विजय मिळवला. अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. परंतु, मुंबई उच्च नायालयाने २०२१ मध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आणि त्यांना दोन लाखांचा दंड ठोठावला. यानंतर नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तेव्हापासून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, असे असतानाही बावनकुळे यांनी जनतेशी दिशाभूल करत निकाल लागल्याचा दावा केला, असा आरोप लोंढे यांनी केला आहे.

WhatsApp channel