मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला रवाना; भाजपचं टेन्शन वाढलं!

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला रवाना; भाजपचं टेन्शन वाढलं!

Jun 05, 2024 11:23 AM IST

Lok Sabha Election 2024 Result: दिल्लीत सत्ता स्थापनेच्या घटनांना वेग आला आहे. एनडीएच्या बैठकीसाठी नितीश कुमार हे दिल्लीला जात असून त्यांच्या सोबत तेजस्वी यादव देखील विमानात असल्याने नितीश कुमार हे नेमके कुणासोबत आहे ? या बाबत चर्चा सुरू झाली आहे.

एनडीएच्या बैठकीसाठी नितीश कुमार हे दिल्लीला जात असून त्यांच्या सोबत तेजस्वी यादव देखील विमानात असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
एनडीएच्या बैठकीसाठी नितीश कुमार हे दिल्लीला जात असून त्यांच्या सोबत तेजस्वी यादव देखील विमानात असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nitish Kumar, Tejashwi Yadav: देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहिर झाले आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. तर एनडीए सरकार बहुमताच्या जवळपास गेले आहे. असे असतांना आता इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही आघाड्या सत्तास्थापणेसाठी प्रयत्न करत आहेत. या साठी आज दिल्लीत दोन्ही आघाड्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत जात आहे तर तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. हे दोन्ही नेते सोबत प्रवास करणार असल्याने नितीश कुमार नेमके कुणासोबत आहेत ? याची चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

PM Modi : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या तयारीत! ९ जूनला घेऊ शकतात शपथ, राष्ट्रपती भवनात जोरादार तयारी

इंडिया आघाडीने नितीश कुमार यांना आपल्या सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून हे दोन्ही नेते एकाच विमानाने दिल्लीला जाणार असल्याने भाजपचं टेंशन वाढले आहे. नितीश कुमार हे एनडीएतून बाहेर पडणार का ? याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळलेल्या नाही. त्यांना एनडीएतील त्यांचे सहकारी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची साथ गरजेची आहे. हे दोन्ही नेते सध्या एनडीएत जरी असले तरी त्यांना इंडिया आघाडीत घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. काल शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याची देखील चर्चा होती.

या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं दुर्दैव काय? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं!

दरम्यान, आज दिल्लीत एनडीए आणि इंडिया आघाडीच्या स्वतंत्र बैठका होणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैतकीसाठी तेजस्वी कुमार तर एनडीएच्या बैठकीसाठी नितीश कुमार हे दिल्लीला जनर आहे. महत्त्वाचे म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व तेजस्वी यादव हे दोन्ही नेते एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज सकाळी १०.४०ल दोघेही विस्तारा फ्लाईटनं दिल्लीला गेले आहेत. एनडीएच्या बैठीकीत टीडीपी व जेडीयू भाजपला पाठिंब्याचे पत्र देणार असल्याची चर्चा आहे. हे पत्र मिळाल्यावर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

नितीश कुमार यांनी चंद्राबाबू यांची सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ४० पैकी नितीश कुमार यांना १२ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला देखील १२ जागा मिळाल्या आहेत. तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना ५ व हिंदुस्थानी अवाम मोर्चाला १ जागा मिळाली आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला ४ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला ३ तर डाव्या पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला जर पुन्हा सत्ता स्थापन करायची असेल तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा गरजेचा आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे देखील या दोघांना त्यांच्या गोटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने भाजपचे टेंशन वाढले आहे.

WhatsApp channel