Lok Sabha Election : पती, पत्नी आणि पॉलिटिक्स! काँग्रेस आमदार पत्नीमुळे BSP लोकसभा उमेदवाराने सोडले घर-bsp candidate leaves home over difference in ideologies with congress mla wife ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : पती, पत्नी आणि पॉलिटिक्स! काँग्रेस आमदार पत्नीमुळे BSP लोकसभा उमेदवाराने सोडले घर

Lok Sabha Election : पती, पत्नी आणि पॉलिटिक्स! काँग्रेस आमदार पत्नीमुळे BSP लोकसभा उमेदवाराने सोडले घर

Apr 06, 2024 08:36 PM IST

Lok Sabha Election : पती-पत्नी आणि पॉलिटिक्सचे हे प्रकरण बालाघाट येथे समोर आले आहे. येथे काँग्रेस आमदार पत्नी अनुभा मुंजारे आणि बहुजन समाज पक्षाचे लोकसभेचे उमेदवार कंकर मुंजारे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे आणि त्यांचे पती लोकसभेचे बसप उमेदवार  कंकर मुंजारे
काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे आणि त्यांचे पती लोकसभेचे बसप उमेदवार कंकर मुंजारे

लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रचार मोहीम गतिमान झाली आहे. अनेक घरांमध्ये पत्नी एका पक्षात तर पती दुसऱ्या पक्षात असे चित्र आहे. यामुळे घराघरात राजकीय तेढ निर्माण झाली आहे. या निवडणुकीया लढाईत पती-पत्नीचे नातेही अडकले आहे. निवडणुकीमुळे बसपाचा लोकसभा उमेदवार पतीला काँग्रेस आमदार पत्नीमुळे घर सोडावे लागले आहे. आता हा बसपा उमेदवार आपले अलिशान घर सोडून बाहेर झोपडीत राहू लागला आहे. जेणेकरून दोघात वेगवेगळी विचारधारा असल्याचे दिसून येईल. 

मध्य प्रदेशातील बालाघाट मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे लोकसभेचे उमेदवार कंकर मुंजारे यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार पत्नी अनुभा मुंजारे यांच्याशी मतभेद झाल्याने शनिवारी (५ एप्रिल) आपले घर सोडले. 

मुंजारे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दोघे एकत्र राहिले असतानाही यावेळी पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. १९ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवसानंतर घरी परतणार असल्याचे बसप नेत्याने सांगितले.

बसपा उमेदवारावर झोपडीत राहण्याची वेळ - 

पती-पत्नी आणि पॉलिटिक्सचे हे प्रकरण बालाघाट येथे समोर आले आहे. येथे काँग्रेस आमदार पत्नी अनुभा मुंजारे आणि बहुजन समाज पक्षाचे लोकसभेचे उमेदवार कंकर मुंजारे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ५ एप्रिल रोजी कंकर मुंजारे आपले सर्व सामान घेऊन गांगुलपाराच्या जवळ एका गावात बनवलेल्या टेंटवजा झोपडीत राहण्यास निघून गेले. दरम्यान घर सोडताना कंकर मुंजारे खूपच भावुक झाल्याचे दिसून आले. 

यावेळी माध्यमांशी बोलताना कंकर मुंजारे यांनी सांगितले की. मी अनुभा मुंजारे यांना घर सोडण्यास सांगितले होते. मात्र अनुभा मुंजारे यांनी असे म्हणत याला नकार दिला की, मुलगी एकदा माहेरहून सासरी आल्यानंतर तिची अंत्ययात्राच सासरच्या घरातून बाहेर जात असते. यामुळे कंकर मुंजारे यांना आमदार पत्नीच्या हट्टापुढे झुकावं लागलं. कंकर यांनी सांगितले की, जर ते एकाच घरात राहिले असते तर लोकांना वाटेल की, मॅच फिक्सिंग आहे.

अनुभा मुंजारे यांनी सांगितले कारण - 

पती घर सोडून निघून गेल्यानंतर अनुभा मुंजारे यांनी सांगितले की, पती कंकर मुंजारे यांनी दोन पक्षांनी वेगळ विचारधारा असल्याने वेगळे राहण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटले की, मी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसची  निष्ठावान पदाधिकारी आहे. बालाघाटमधून काँग्रेसचे  उमेदवार सम्राट सारस्वत यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे  अनुभा यांनी सांगततले. तसेच प्रचारादरम्यान पतीबद्दल कोणतेही वाईट बोलणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून याची सुरुवात १९ एप्रिलपासून होत आहे. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे व १ जून रोजी मतदान होणार असून  लोकसभेच्या सर्व ५४३ जागांसाठी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Whats_app_banner