Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिला यादी जाहीर केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारांच्या पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांचा समावेश आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने पहिली यादी जाहीर केली. या यादीत ३४ केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांसह एकूण १९५ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली.
महत्त्वाचे म्हणजे, भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवारांचा समावेश नाही. भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, नरेंद्र मोदी (वाराणसी), अमित शाह (गांधीनगर), श्रीपाद नाईक (उत्तर गोवा) निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण २८ महिलांचा समावेश आहे. पहिल्या यादीत ४७ असे उमेदवार आहेत ज्यांचे वय ५० पेक्षा कमी आहे. यादीत एसी (२७), एसटी (१८) आणि ओबीसीच्या ५७ उमेदवारांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश- ५१, पश्चिम बंगाल- २०, मध्य प्रदेश- २४, गुजरात- १५, राजस्थान- १५, केरळ- १२, तेलंगणा- ०९, आसाम- १२, झारखंड- ११, छत्तीसगड- ११, दिल्ली- ०५, जम्मू् काश्मीर- ०२, उत्तराखंड- ०३, अरुणाचल प्रदेश- ०२, गोवा- ०१, त्रिपूरा-०१, अंदमान निकोबार- ०१, दीव दमन- ०१.
संबंधित बातम्या