लोकसभा निवडणुकीसाठी(Lok Sabha Election 2024) भाजपने पाचवी यादी जाहीर (BJP Candidate List) केली आहे. या यादीत यूपी-बिहारसह अन्य राज्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपाने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावतला मैदानात उतरवले आहे. तर पीलीभीत मतदारसंघात वरुण गांधी यांचे तिकीट कापले असून त्यांच्या जागी जितिन प्रसाद यांना उमेदवार बनवले आहे. त्याचबरोबर हरियाणामधील कुरुक्षेत्रमधून आजच भाजपमध्ये आलेल्या नवीन जिंदल यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपाने १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर भाजपच्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील ३ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणाकेली आहे. यामध्ये सोलापूर मतदारसंघातून विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर यांचे तिकीट कापण्यात आले आहे. येथूनआमदार राम सातपुते यांना उमेदवारी देत नवा चेहरा दिला आहे. येथे राम सातपुते यांची लढत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याशी होईल.
भाजपने आपल्या पाचव्या यादीततीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात सोलापूर मतदारसंघातूनआमदार राम सातपुते, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून सुनिल बाबूराव मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक महादेवराव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते अशा तरुण उमेदवारांची लढतहोणार आहे. भाजपनेचौथ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आज तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली गेली.
संबंधित बातम्या