भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांचा यू-टर्न, आधी लोकसभा लढण्यास नकार अन् आता म्हणाले..
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांचा यू-टर्न, आधी लोकसभा लढण्यास नकार अन् आता म्हणाले..

भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांचा यू-टर्न, आधी लोकसभा लढण्यास नकार अन् आता म्हणाले..

Published Mar 13, 2024 05:20 PM IST

Lok Sabha Election 2024 : आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढण्यास नकार देणाऱ्या भोजपुरी स्टार पवन सिंह यांनी यू टर्न घेत पुन्हा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भोजपुरी अभिनेता पवन सिंह लोकसभा लढण्यास तयार
भोजपुरी अभिनेता पवन सिंह लोकसभा लढण्यास तयार

पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढण्यास नकार देणाऱ्या भोजपुरी स्टार पवन सिंह यांनी यू टर्न घेत पुन्हा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पवन सिंह यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर म्हटले की, मी आपला समाज, जनता जनार्दन आणि आईला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढणार आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित आहे, जय माता दी.

लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने काही दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा जागेवरून भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता पवन सिंह (Pawan Singh) यांना मैदानात उतरवले होते. मात्र त्यानंतर पवनसिंह यांनी २४ तासातच आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार दिला होता. आसनसोल मतदारसंघातून सध्या अभिनेते शत्रुघ्न सिन्हा टीएमसी खासदार आहेत. 

कोणत्या मतदारसंघातून लढणार निवडणूक -

आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर पवन सिंह यांनी बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. भेटीनंतर पवनसिंह यांनी सांगितले की, आसनसोल किंवा अन्य जागेवरून लढण्याचा जो निर्णय होईल तो चांगलाच होईल.

कोण आहे पवन सिंह -

पवन सिंह भोजपुरी पार्श्व गायक असून त्यांना भोजपुरी गीत, लॉलीपॉप लागेलु (Lollypop Legelu) साठी ओळखले जाते. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना दोन आंतरराष्ट्रीय भोजपुरी चित्रपट पुरस्कार मिळाले आहे. पवन सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी झाला असून ते राजपूत कुटूंबातील आहे. पवन सिंह यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. चित्रपटात अभिनय आणि सिंगिगसोबत त्यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार पवन सिंह यांची अंदाजे संपत्ती जवळपास ६-८ मिलियन डॉलर (सुमारे ५०-६५  कोटी रुपये) आहे. पवन सिंह भोजपुरीमधील सर्वात महागडा अभिनेता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या