मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Beed Lok Sabha Constituency Result: बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर, बजरंग सोनवणे आघाडीवर

Beed Lok Sabha Constituency Result: बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर, बजरंग सोनवणे आघाडीवर

Jun 04, 2024 11:34 AM IST

Pankaja Munde vs Bajrang Sonawane: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत.

Lok Sabha Election 2024: बीड लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची माहिती समोर आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) हे ८ हजार ९६५ मतांनी आघाडीवर आहे. तर, भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) पिछाडीवर पडताना दिसत आहेत. बीडमधील हायहोल्टेज लढतीत सर्वांचे लक्ष आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनावणे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्यात लढत सुरू आहे. नुकतेच हाती आलेल्या आकड्यानुसार, अशोक हिंगे लढतीत मागे पडल्याचे दिसत असून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. गाव बैठकीपासून तर देशाच्या नेत्यापर्यंत सभांमध्ये जातीच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आले.

बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, मतमोजणीनंतर कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले. आतापर्यंत चार फेऱ्यांची आकडेवारी समोर आली.त्यानुसार बजरंग सोनवणे हे ८ हजार ९६५ आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांना ९२ हजार ३२५ मत मिळाली आहेत. तर, बजरंग सोनवणे यांनी एक लाख ०१ हजार २८१ मत मिळवली आहेत.

राज्यात बीडमध्ये सर्वाधिक ७०.९२ टक्के मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले. बीडमध्ये राज्यात सर्वाधिक ७०.९२ टक्के मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडचे, त्यावर बीडचा खासदार कोण हे ठरणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते मिळाली होती. तर, बजरंग सोनवणे यांच्या खात्यात ५ लाख ९ हजार १०८ मत जमा झाली. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९१ हजार ९७२ मतासह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

WhatsApp channel