Ajit Pawar : सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेत रोहित पवार भावुक, अजित पवारांनी केली मिमिक्री, म्हणाले एका पठ्ठ्याने..
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ajit Pawar : सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेत रोहित पवार भावुक, अजित पवारांनी केली मिमिक्री, म्हणाले एका पठ्ठ्याने..

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेत रोहित पवार भावुक, अजित पवारांनी केली मिमिक्री, म्हणाले एका पठ्ठ्याने..

May 05, 2024 08:23 PM IST

Ajit Pawar on Rohit Pawar: बारामतीच्या सभेत आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्लाबोल केला. आपल्या भाषणादरम्यान रोहित भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावनंतर अजित पवारांनी रोहित पवारांची मिमिक्री करत हा रडीचा डाव असल्याचे म्हटले.

अजित पवारांनी  भरसभेत केली रोहित पवारांची मिमिक्री .
अजित पवारांनी भरसभेत केली रोहित पवारांची मिमिक्री .

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्याचं लक्षबारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. इतिहासात प्रथमच बारामती मतदारसंघात (Baramati lok sabha) पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज बारामती येथील सांगता सभेत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केली. यावेळी रोहित पवार भावूक झालेले पाहायला मिळाले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराची सांगता झाली. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी सभा घेत एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. बारामतीच्या सभेत आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्लाबोल केला तसेच भाषणादरम्यान शरद पवारांचे एक विधान सांगून भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. रोहित पवार यांना रडू कोसळल्याचा दाखला देत अजित पवारांनी त्यांची नक्कल करत अजित पवार म्हणाले की, मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या एका पठ्ठ्याने तर डोळ्यातून पाणी काढले. मी पण पाणी काढूनदाखवतो मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर अजिबात खपवून घेणार नाहीत. हा रडीचा डाव झाला. तुम्ही कामाच्या जोरावार मते मागा, आपले खणखणीत नाणे दाखवा.

अजित पवार म्हणाले त्यांना मीच जिल्हा परिषदेचे तिकीट दिलेहोते. पवार साहेबांनी नको म्हटले असतानाही त्यांना तिकीट दिले. त्यानंतर त्यांनी हडपसरमधून आमदारकीचे तिकीट मागितलं. पण आम्ही त्याला अहमदनगर जामखेडमधून तिकीट दिले. तिथे आमचेही काही काम आहे. आम्ही त्यांना राजकारणाचे बाळकडू पाजले आणि आता आमच्यावर टीका करत आहेत.

 

काय म्हणाले रोहित पवार -

सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. जोपर्यंत नवीन पिढी तयार होत नाही तोवर डोळे मिटणार नसल्याचे शरद पवार साहेबांनी सांगितले असल्याचे रोहित पवार म्हणाले.रोहित पवार प्रचार सभेत म्हणाले की, आम्हाला सुप्रिया ताईंना देशाची कृषीमंत्री झाल्याचे बघायचे आहे. रोहित पवार यांनी यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सभेत लावला. या व्हिडिओत चंद्रकांत पाटील म्हणाले होते,की आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नाही. विरोधकांनी शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या टीकेच व्हिडीओ रोहित पवार सभेत दाखवले. यावेळी रोहित पवार भावनिक झाले अन् त्यांना स्टेजवरचं रडू कोसळलं.

Whats_app_banner