मराठी बातम्या  /  elections  /  Upendra Rawat News : भाजपमध्ये चाललंय काय? आणखी एका उमेदवाराची निवडणुकीतून माघार, अश्लील व्हिडिओ ठरलं कारण

Upendra Rawat News : भाजपमध्ये चाललंय काय? आणखी एका उमेदवाराची निवडणुकीतून माघार, अश्लील व्हिडिओ ठरलं कारण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 04, 2024 05:26 PM IST

Upendra Singh Rawat : उत्तर प्रदेशातील बाराबंकी लोकसभा (Barabanki loksabha Seat) मतदारसंघाचे भाजपचे (BJP) उमदेवार उपेंद्रसिंह रावत यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

भाजपच्या आणखी एका उमेदवाराची माघार, अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानं निर्णय
भाजपच्या आणखी एका उमेदवाराची माघार, अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानं निर्णय

Upendra Singh Rawat :  पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पवन सिंह यांच्यानंतर उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) एकाच मतदारसंघासाठी दुसऱ्यांदा उमेदवार जाहीर करण्याची वेळ भाजपवर आली आहे. यूपीच्या बाराबंकी लोकसभा मतदारसंघाचे (Barabanki Lok Sabha Seat) उमेदवार उपेंद्रसिंह रावत यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उपेंद्र रावत यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

उपेंद्र रावत हे बाराबंकी मतदारसंघाचे खासदार आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत उपेंद्र रावत यांचं नाव होतं. त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. त्यानंतर आज उपेंद्र रावत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

उपेंद्र रावत यांच्या म्हणण्यानुसार माझा एक एडिटेड व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. जो डीपफेक एआय तंत्रज्ञानाद्वारे बनविला गेला आहे. या प्रकरणी मी एफआयआर दाखल केली आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी या सगळ्याची चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत सार्वजनिक जीवनातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं रावत यांनी म्हटलं आहे.

पॉर्न व्हिडिओचा मुद्दा काय आहे?

भाजप खासदार उपेंद्र सिंह रावत यांना पुन्हा तिकीट मिळाल्यानंतर २४ तासांत अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. यामध्ये परदेशी महिलांसोबत दिसणारे व्यक्ती उपेंद्र रावत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशात उलटसुलट चर्चा सुरू झाली. उपेंद्र रावत यांनी हे व्हिडिओ डीप फेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी तो एडिट करून व्हायरल केला जात आहे, असा दावा रावत यांनी केला आहे. या प्रकरणी रावत यांच्या स्वीय सचिवांनी कोतवालीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

वेगवेगळ्या बातम्यांनुसार, एकूण सात व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. हा प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळ्या महिलांसोबतचा आहे. सर्व क्लिप पाच मिनिटे एक सेकंदांच्या आहेत. हे व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून बनवण्यात आल्याचं दिसून येत आहे. पहिल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर डीजेचा आवाजही येत आहे. कुठेतरी कुठलातरी कार्यक्रम चालू आहे असं दिसत आहे.

WhatsApp channel