Amravati lok sabha : अमरावती लोकसभेच्या निकालात आता दाखवून देऊ, बच्चू कडूंचा भाजपला इशारा
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amravati lok sabha : अमरावती लोकसभेच्या निकालात आता दाखवून देऊ, बच्चू कडूंचा भाजपला इशारा

Amravati lok sabha : अमरावती लोकसभेच्या निकालात आता दाखवून देऊ, बच्चू कडूंचा भाजपला इशारा

Mar 27, 2024 08:54 PM IST

Amravati lok Sabha constituency : आता बोलण्यासारखे किंवा कोणाकडे तक्रार करण्यासारखे काहीही उरलेले नाही. आताअमरावती लोकसभेच्या निकालात आम्ही दाखवून देऊ,असा गर्भित इशारा बच्चू कडू यांनी राणा तसेच भाजपला दिला आहे.

नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडूंची पहिला प्रतिक्रिया
नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडूंची पहिला प्रतिक्रिया

 भाजपने आज उमेदवारांची सातवी लिस्ट प्रसिद्ध करत दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या यादीत नवीन राणा (Navneet rana) यांना अमरावतीमधून (Amravati lok Sabha constituency) उमेदवारी दिल्याची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत राणाबरोबरच गोविंद करजोल यांना कर्नाटकातील चित्रदुर्ग मतदारसंघातून भाजपने संधी दिली आहे. नवनीत राणा यांना भाजपने संधी देताच प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आहे. आता बोलण्यासारखे किंवा कोणाकडे तक्रार करण्यासारखे काहीही उरलेले नाही. आता अमरावती लोकसभेच्या निकालात आम्ही दाखवून देऊ, असा गर्भित इशारा बच्चू कडू यांनी राणा तसेच भाजपला दिला आहे. 

आम्ही सर्वांचा विरोध डावलून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचं काम केलं आहे. आता आम्ही आमचं काम करू. नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम राहील. महायुतीला आणि भाजपला आमची गरज नाही. त्यामुळे आता पुढचा विचार आम्ही करू. नवनीत राणांनी आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने आमचे कार्यकर्ते त्यांचे काम करू शकणार नाहीत. भाजपच्या प्रचारात आम्ही सामील होणार नाही.

बच्चू कडू म्हणाले अमरावती मतदारसंघात आम्हाला न विचारता भाजपने उमेदवार दिला आहे. मतदारसंघाचा आढावा घेऊन नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा आम्ही निर्णय घेऊ. मात्र अमरावतीचा कौल हा नवनीत राणा यांच्याविरोधात असेल. महायुतीला अमरावतीचा उमेदवार ठरवताना आमच्याशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही.मात्र आम्ही अमरावतीच्या निकालात आमची नाराजी दाखवून देऊ. 

Whats_app_banner