मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Asaduddin Owaisi : मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; पंतप्रधान मोदींवर पलटवार करताना असं का म्हणाले ओवैसी?

Asaduddin Owaisi : मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; पंतप्रधान मोदींवर पलटवार करताना असं का म्हणाले ओवैसी?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 28, 2024 09:54 PM IST

Asaduddin Owaisi On Modi : केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही संकोचवाटत नाही. असा पलटवार ओवैसींनी मोदींवर केला आहे.

ओवैसींचा मोदींवर पलटवार
ओवैसींचा मोदींवर पलटवार

AIMIM प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार पलटवार केला. ओवैसींनी पंतप्रधान मोदींवर (Pm Narendra Modi) निशाणा साधताना म्हटले की, त्यांची एकच गॅरंटी आहे. ती म्हणजे दलित आणि मुसलमानांचा द्वेष करणे. देशाचे पंतप्रधान देशाच्या १५ टक्के लोकसंख्येला घुसखोर म्हणतात यासारखी लाजीरवाणी गोष्ट दुसरी नाही. ओवैसींनी दावा केला की, देशात सर्वाधिक कंडोमचा वापर मुस्लिम लोक करतात.

ट्रेंडिंग न्यूज

असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर पलटवार केला. ओवैसींनी म्हटले की, नरेंद्र मोदी हिंदू बांधवांना भिती दाखवत आहेत. ते म्हणतात की, मुस्लिम लवकरच बहुसंख्यांक होतील. आमचा धर्म भलेही वेगळा असेल मात्र आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. अखेर ती द्वेषाची भिंत का उभी करत आहेत.

ओवैसी म्हणाले, द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुसलमान अधिक मुलं जन्माला घालतात, अशी भीती पसरवली जात आहे. मात्र केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही संकोच वाटत नाही.

ओवैसी म्हणाले,ही मी गोळा केलेली माहिती नाही तरमोदी सरकारचा डेटा आहे. दुसरीकडे मोदी देशात द्वेष पसरवत आहेत. मुस्लिमांचा जन्मदर सर्वाधिक असल्याचे सांगत हिंदू लोकांची दिशाभूल केली जात आहे.

गेल्या आठवड्यात राजस्थानमधील बांसवाडा येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते, काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, लोकांची संपत्ती तसेच माता-भगिनींचे सोने आणि मंगळसूत्रही हिसकावून घेऊन ज्यांना अधिक मुलं आहेत त्यांना वाटून टाकतील. त्यावेळी मोदींनी मुस्लिम असे नावही घेतले होते.

 

मोदी त्या सभेत म्हणाले होते की,मनमोहन सिंग सरकारने म्हटले होते की,देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचाआहे.याला प्रत्युत्तर देताना ओवैसी म्हणाले, एका देशाचे पंतप्रधान१५टक्के लोकांना घुसखोर म्हणतअसतील तर हेअत्यंत लज्जास्पद आहे.

WhatsApp channel