मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amravati Lok Sabha Election: भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव; काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी मारली बाजी!

Amravati Lok Sabha Election: भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव; काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी मारली बाजी!

Jun 04, 2024 05:21 PM IST

Amravati Lok Sabha Election Result 2024: मतमोजणी सुरू झाल्यापासून कधी नवनीत राणा, तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर होते. पण, जनतेने शेवटी बळवंत वानखेडे यांचीच निवड केली.

भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव
भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव

Amravati Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांची काँग्रेस-महाविकास आघाडीचे नेते बळवंत वानखडे यांच्याशी लढत होती. या निवडणुकीच्या रणात बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. मात्र, या दोघांमधील स्पर्धा खूपच चुरशीची होती. मतमोजणी सुरू झाल्यापासून कधी नवनीत राणा, तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर होते. पण, जनतेने शेवटी बळवंत वानखेडे यांचीच निवड केली. अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले.

ट्रेंडिंग न्यूज

२६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकूण ६३.६७ टक्के लोकांनी मतदान केले. अमरावती मतदारसंघातून एकूण ३७ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये होती. यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

Lok Sabha Election 2024: ‘किशोरी भैय्या, मला कधीच शंका नव्हती...’; प्रियांका गांधींनी केलं कौतुक!

नवनीत राणा यांच्या राजकीय कारकीर्द

२०१९च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला. २०१४मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. अमरावती लोकसभेची जागा अनेकवेळा शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, येथून भाजपला कधीही विजय मिळाला नाही. नवनीत यांनीही अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, यावेळीही अमरावतीतून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Lok Sabha Election 2024: विदर्भात भाजपप्रणित महायुतीला मोठा धक्का! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर पण…

नवनीत राणा यांचा थोडक्यात परिचय

राजकारणात येण्यापूर्वी नवनीत राणा यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. पण, २०११मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला चित्रपटसृष्टीपासून ते राजकीय दिग्गजांपर्यंत सगळ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. नवनीत आणि रवी यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

नवनीत राणा यांचे पती अमरावतीचे आमदार होते. अशा परिस्थितीत नवनीत यांनी देखील चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात प्रवेश केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने त्यांना अमरावतीतून तिकीट दिले होते, पण त्यांचा पराभव झाला होता. मात्र, ५ वर्षानंतर २०१९मध्ये त्यांनी अमरावतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून भाजपला पाठिंबा दिला. यावेळीही त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात होत्या, पण त्यांचा पराभव झाला.

WhatsApp channel