Amethi election result 2024 : अमेठी लोकसभा उत्तरप्रदेशमधीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात हॉट जागांपैकी एक आहे. येथे भाजपच्या स्मृती इराणी (smriti Irani) पुन्हा एकदा मैदानात आहेत. त्या आतापर्यंतच्या मतदानाच्या फेरीत पिछाडीवर पडल्या आहेत. काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा (kl sharma) २३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. २०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यावेळी राहुल गांधी अमेठीतून न लढता रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने अमेठीतून गांधी कुटूंबाचे निष्ठावंत समजले जाणाऱ्या किशोरी लाल शर्मा यांना दिली आहे.
अमेठीत २० मे रोजी मतदान झाले होते. यावेळी ५४.३४ टक्के वोटिंग झाले होते. आता याचे निकाल समोर येत आहेत. येथे प्रियंका गांधींनी किशोरी लाल यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त प्रचार सभा झाली होती. त्यामुळे आता पाहणे उत्सुकतेचे आहे.
२००४, २००९ , २००९ आणि २०१४ मध्ये अमेठीतून विजय मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये त्यांना भाजपच्या स्मृती इराणी ५० हजाराहून अधिक मतांनी पराभूत केले होते.
१ जून रोजी मतदानाच्या सर्व फेऱ्या संपल्यानंतर देशासह जगाची उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता समोर येत आहेत. देशभरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीच्या निकालांमध्ये ५४३ जागांपैकी २०० हून अधिक जागांवर इंडिया आघाडी पुढे असल्याचं दिसत आहेत. त्यात काँग्रेसची कामगिरी लक्षणीय दिसत आहे. काँग्रेसने आतापर्यंत १५० जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसचे केवळ ४४ उमेदवार विजयी झाले तर २०१९ च्या निवडणुकीत यामध्ये ६ खासदारांची भर पडून हा आकडा ५२ पर्यंत गेला.
मागील निवडणुकीत ज्या राज्यात काँग्रेसनं चांगले यश मिळवलं त्या राज्यासह उत्तरेकडील काही राज्यात काँग्रेसची कामगिरी सुधारल्याचे दिसत आहे. २०१९ व २०१४ च्या निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसने केवळ १-२ जागांवर विजय मिळवला होता. तेथे यावेळी जागा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी काँग्रेसच्या जागा वाढत असल्या तरी लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात काँग्रेसनं पहिल्यांदाच ३२७ इतक्या कमी जागांवर उमेदवार उभे केले होते.
संबंधित बातम्या