मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Abhijit Bichukale : स्वत:ला शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणत अभिजित बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, साताऱ्यातून लढणार

Abhijit Bichukale : स्वत:ला शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणत अभिजित बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, साताऱ्यातून लढणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 17, 2024 06:28 PM IST

Abhijit Bichukale : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले व शशिकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

स्वत:ला शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणत अभिजित बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, साताऱ्यातून लढणार
स्वत:ला शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणत अभिजित बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, साताऱ्यातून लढणार

Lok Sabha Election 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून जनतेनं मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन करत बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bhichukale) यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या १९ एप्रिलला ते निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

बिचुकले यांनी स्वत: ही माहिती दिली. सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असणार याविषयी बरेच दिवस काथ्याकूट सुरू होता. श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतल्यानं इथं कोणाला उतरवायचं यावर पवारांनी बराच खल केला. शेवटी शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात माळ पडली. तर, महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव शेवटच्या क्षणी निश्चित झालं आहे. आता बिचुकले यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

भाजपनं छत्रपतींचा किती मान ठेवला याचं आत्मपरीक्षण करा!

भाजपचं तिकीट मिळावं ही उदयनराजे यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली. मात्र भाजपनं छत्रपती शिवाजी महाराजांचा किती सन्मान केला याचं आत्मपरिक्षण उदयनराजेंनी व लोकांनी करावं, असं बिचुकले म्हणाले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव संसदेला द्यावं व अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्यामुळं सर्व जनतेनं माझ्या पाठिशी उभं राहावं, असं आवाहन बिचुकले यांनी केलं आहे.

शरद पवार उदयनराजेंचं खच्चीकरण करतायत!

शरद पवार आणि उदयनराजे यांचं हाडवैर आहे. मी या सर्वांशी लढतो आहे. या दोघांनाही तुम्ही संधी दिली. आता मला एकदा संधी द्यावी, असं बिचुकले म्हणाले. शरद पवारांनी अभयसिंह महाराजांचं खच्चीकरण केलं होतं. त्यापेक्षा जास्त ते उदयनराजे यांचं खच्चीकरण करतात. त्यावर मी आत्ताच बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन,' असा इशाराही बिचुकले यांंनी यावेळी दिला.

मतदारांनी जागृत होण्याची वेळ आलीय!

'शक्ती ही युद्धात दाखवायची असते. दोन रुपयांची दारू पाजून आणि मटणं देऊन शक्ती दाखवली जात नाही. कोणीही मनात संशय ठेवू नये. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मला लोकांनी चांगली साथ दिली. चांगलं मतदान केलं. आता मतदारांनी अधिक जागृत व्हायला पाहिजे, असं बिचुकले म्हणाले.

WhatsApp channel