मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Eknath Shinde : त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंची भाजपला ऑफर; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde : त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंची भाजपला ऑफर; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 29, 2024 05:57 PM IST

Eknath Shinde on Uddhav Thackeray : आम्ही सर्व आमदार सूरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत भाजप नेत्यांना फोन करून त्यांना सोबत घेऊ नका, आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

उद्धव ठाकरेंची भाजपला ऑफर; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरेंची भाजपला ऑफर; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जसेजसे निवडणुकीचे टप्पे पुढे सरकत आहेत, तस-तसे राजकीय वातावरण तापत आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यावर्षीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे यंदा शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडून दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यातच दोन्ही बाजुकडील नेत्यांकडून एकमेकांची गुपिते बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांतील फुटीनंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. उद्धव ठाकरेंवर प्रत्येक सभेत हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत सूरतला आले होते. तेव्हा मुंबई व दिल्लीत काय सुरू होते, ते तुम्हाला सांगणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे नेतेहीशरद पवारांबाबत असेच गौप्यस्फोट करत आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, आम्ही सूरतला गेल्यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) दिल्लीला फोन केला होता. त्यांनी म्हटले होते की, त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्या सोबत येतो. उद्धव ठाकरेंनी भाजपला अशीऑफरच (Uddhav thackeray offer to BJP) दिल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.

शिंदे म्हणाले की, आम्ही सुरतला लपूनछपून गेलो नव्हतो, तर जाहीरपणे गेलो होतो. आम्हाला परत बोलवावण्याचे खूप प्रयत्न झाले. आमचे पुतळे जाळले गेले. पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या शिवसेनेला वाचविण्यासाठी आणि शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी आम्ही हे मोठे पाऊल उचलले होते. मात्र त्यावेळी उद्धव यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

 

त्यामुळेच मी भाजपसोबत गेलो – शिंदे

शिंदे म्हणाले, जनतेला भाजप-शिवसेना युतीला सत्ता दिली होती. मात्र जनमताचा अनादर करून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवले गेले. भाजपसोबत युती तोडायची त्यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त केली. मला सत्ता आणि पैशाचा मोह नाही. पैशाचा, खोक्याचा मोह कुणाला? हे लोकांना चांगलेच माहिती आहे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. मला संधी मिळाली. त्याचं मी सोनं करतोय, असेही शिंदे म्हणाले.

WhatsApp channel