मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : मोठी बातमी! रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर राहुल गांधी आघाडीवर, स्मृती इराणी पिछाडीवर

Lok Sabha Election : मोठी बातमी! रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर राहुल गांधी आघाडीवर, स्मृती इराणी पिछाडीवर

Jun 04, 2024 10:56 AM IST

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत असून या दोन्ही ठिकाणावरून आता पर्यंतच्या फेरीत राहुल गांधी हे आघाडीवर आहेत. तर अमेठीतून स्मृती इराणी या पिछाडीवर आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून आघाडीवर आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून आघाडीवर आहेत.

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशात रायबरेली आणि केरळच्या वायनाड मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर अमेठीतून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी या पिछाडीवर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Election Results 2024 Live Updates : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी, अजित पवारांना धक्का

सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा पासून राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड येथून पुढे होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे यूपीच्या हायप्रोफाईल लोकसभा सीट रायबरेली येथून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा निवडणुकीत पराभव करताना दिसत आहेत. तर केरळमधील वायनाडमधील त्यांचे प्रतिस्पर्धी माकपच्या ॲनी राजा यांच्यापेक्षा त्यांनी मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

Lok Sabha Election Result: हिंगोलीनंतर कल्याणमध्येही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, मतमोजणीला उशीर!

राहुल गांधी यांनी २०१९मध्येही दोन जागांवर लढवली होती निवडणूक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. राहुल गांधी वायनाडमधून ४.३७ लाख मतांनी विजयी झाले होते, पण अमेठीमध्ये त्यांचा स्मृती इराणींनी पराभव केला होता. भाजपने यावेळीही भाजपने अमेठीतून स्मृती इराणी यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे. किशोरीलाल शर्मा हे गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. त्यांचे गांधी कुटुंबाशी जुने नाते आहे. या मतदार संघातून स्मृती इराणी या पिछाडीवर आहेत तर किशोरीलाल शर्मा हे आघाडीवर आहेत.

किशोरी लाल शर्मा हे मूळचे पंजाबच्या लुधियाना येथील आहेत आणि राजीव गांधी यांनी १९८३ पहिल्यांदा अमेठीतून त्यांना उमेदवारी दिली होती.

एनडीए आणि इंडिया आघाडीत काटे की टक्कर

देशात आज सकाळी ८ पासून मत मोजणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत सकाळ पासून एनडीएने आघाडी घेतली होती. तर काही वेळाने इंडिया आघाडीने देखील आघाडी घेतली होती. सध्या एनडीए आघाडी २५६ पेक्षा अधिक जागावर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी देखील २३१ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर होती. दुपार पर्यंत देशातील चित्र स्पष्ट होणार आहे. 

WhatsApp channel