मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election Result 2024: भाजपचं टेन्शन वाढलं? महाराष्ट्रासह पाच राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता

Lok Sabha Election Result 2024: भाजपचं टेन्शन वाढलं? महाराष्ट्रासह पाच राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता

Jun 04, 2024 12:48 PM IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.

महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रेदश, पश्चिम बंगाल आणि हरियाणात भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रेदश, पश्चिम बंगाल आणि हरियाणात भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे. (PMO photo)

2024 Election Results Lok Sabha: सात टप्प्यांत पार पडलेल्या १८व्या लोकसभा निवडणुकांची आज मतमोजणी होत आहे.या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाला किती जागा मिळणार, कोणत्या पक्षाच्या हाती सत्ता जाणार? याबाबत सर्वांनाच उस्तुकता लागलेली असताना भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये मोठा फटका बसताना दिसत आहे. यात उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपने मित्रपक्षांसह गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी एकूण ६४ जागा जिंकल्या आहेत. तर, समाजवादी पक्ष, भारतीय समाजवादी पक्ष यांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. भाजप ३७ जागांवर आघाडीवर असला तरी सपा आणि काँग्रेस अनुक्रमे ३३ आणि ०७ जागांवर पुढे आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे, जिथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएच्या एकूण ४१ जागा निवडून आल्या होत्या, ज्यात भाजपच्या २३ आणि शिवसेना १८ जागा होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजप १२ जागांसह आघाडीवर आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेला ६, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच महायुती २२ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने उल्लेखनीय कामगिरी केली. महाविकास आघाडी ३० जागांवर पुढे आहे. ज्यात ठाकरेंची शिवसेना- १२, शरद पवारांची राष्ट्रवादी- ७ जागा आणि काँग्रेस १० जांगावर आघाडीवर आहे.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला १८ जागेवर विजय मिळवण्यात यश आले होते. तर, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील तृणमूल काँग्रेसने २२ जागा जिंकल्या. परंतु, यावेळी तृणमूल काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप ८ जागांवर पुढे आणि काँग्रेस ३ जागांवर पुढे आहे.

भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपने २५ पैकी २४ जागा जिंकल्या. मात्र, यंदा चित्र बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला भाजप १३ आणि काँग्रेस ९ जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १० पैकी १० जागा जिकल्या. यंदा येथे काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसचे उमेदवार ५ जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप ४ आणि आप १ जागेवर पुढे आहे.

WhatsApp channel