Nitin Gadkari on traffic jam : देहु ते पंढरपुर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पासून पंढरपूरपर्यंत१२ हजार कोटींचा पालखी मार्ग केला. मात्रवाढणारी लोकसंख्या आणि गाड्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या पाहता, कितीही रस्ते बांधले, मोठ मोठे महामार्ग बांधले तरी रस्त्यांवरची वाहतुक कोंडी सुटत नाही,असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले आहे. एका प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) वाहतूक कोंडींच्या समस्येवर भाष्य केले.
नितीन गडकरी म्हणाले की, वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुणे-औरंगाबाद महामार्गावर डबलडेकन फ्लायओहर बांधण्याची योजना आहे. यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पुणे-नाशिक मार्गावरही वाहतुक कोंडीची समस्या आहे. नाशिक फाटा ते चांडोली या मार्गावर डबल डेकर मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी १० हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. जमिनीवर सहा पदरी महामार्ग त्यावर फ्लायओहर अन् तिसरा मजला मेट्रो मार्ग असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यातून बऱ्याच प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गावर ५४ किलोमीटर लांबीचा तीन मजली मार्ग व मेट्रो अशी योजना आहे. पुणे नगर मार्गावर शिरुर पर्यत वाहतुक मार्गावर वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी, मजूर व कामगारांचे कल्याण व्हावे, शेतीवर व्यापार विकास होण्यासाठी वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन पाहिजे यातुन शेतीचा विकास आणि रोजगारही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर येणार असून आमच्या सरकारने इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. शेतकरी हा अन्नदाता न रहाता उर्जा दाता, इंधन दाता तसेच हायड्रोजन दाता व्हायला पाहिजे. गावखेडी संपन्न आणि समृद्ध व्हायला पाहिजेत, असेही गडकरी म्हणाले.
केजरीवाल म्हणले, “पंतप्रधान मोदी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपाची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपामधीलही मोठे नेते राजकीय मंचावर दिसणार नाहीत. लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल, तर सप्टेंबर २०२५ नंतर अमित शाह देशाचे पंतप्रधान होतील, असा खळबळ जनक दावा केजरीवाल यांनी केला.
संबंधित बातम्या