Lok sabha Election 4 phase voting live : राज्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल इतके टक्के झाले मतदान; वाचा
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok sabha Election 4 phase voting live : राज्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल इतके टक्के झाले मतदान; वाचा

Lok sabha Election 4 phase voting live : राज्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल इतके टक्के झाले मतदान; वाचा

May 13, 2024 11:58 AM IST

Lok sabha Election 4 phase voting live : देशात आज चौथ्या टप्पातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील ११ तर देशातील १० राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. या मतदार संघात १७.७ कोटी मतदार आहेत. ते १.९२ लाख मतदान केंद्रांवर मतदान करून १७१७ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

पुण्यात मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लागलेल्या रांगा.
पुण्यात मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लागलेल्या रांगा.

Lok sabha Election 4 phase voting live : निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत आज मतदान होणार आहे. विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड आणि अहमदनगर या मतदारसंघांतील प्रचाराचा धुराळा शनिवारी शांत झाला. देशातील 10 राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदार संघात १७.७ कोटी मतदार आहेत. ते १.९२ लाख मतदान केंद्रांवर मतदान करून १ हजार ७१७ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. अनेक भागात मतदान साहित्य आणि मतदान पथके हवाई मार्गाने पाठवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. तेलंगणातील १७ लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत. ही मतदान केंद्र सजवण्यात आली आहे. येथे सेल्फी बूथ देखील लावण्यात आले आहे. आज सकाळी ७  पासून मतदान करण्यास सुरुवात झाली असून नागरिकांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर सकाळ पासून पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत. ही मतदान केंद्र सजवण्यात आली आहे. येथे सेल्फी बूथ देखील लावण्यात आले आहे. आज सकाळी ७ पासून मतदान करण्यास सुरुवात झाली असून नागरिकांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर सकाळ पासून पाहायला मिळत आहे.

निवडणुकीचे लाईव्ह वार्तांकन करतांना पत्रकाराचा बीडमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू 

बीड लोकसभा निवडणुकीचे लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी मुबंई येथून अंबाजोगाई शहरात आलेले 'आज तक'चे पत्रकार वैभव कनगुटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे दुःखद निधन झाले.  वैभव कनगुटकर हे आज तकचे सिनियर कॅमेरामन होते. आज सकाळी त्यांना फिल्ड वरच ऍसिडिटीचा खूप त्रास जाणवू लागला. परंतु अचानक त्यांचे दुर्दैवी निधन झाले. 

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.

नंदुरबार - २२.१२ टक्के

जळगाव- १६.८९ टक्के

रावेर - १९.०३ टक्के

जालना - २१.३५ टक्के

औरंगाबाद - १९.५३ टक्के

मावळ -१४.८७ टक्के

पुणे - १६.१६ टक्के

शिरूर- १४.५१ टक्के

अहमदनगर- १४.७४ टक्के

शिर्डी -१८.९१ टक्के

बीड - १६.६२ टक्के

 

 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

जळगाव- ६.१४ टक्के

जालना - ६.८८ टक्के

नंदुरबार - ८.४३ टक्के

शिरूर- ४.९७ टक्के

अहमदनगर- ५.१३ टक्के

औरंगाबाद - ७.५२ टक्के

बीड - ६.७२ टक्के

मावळ -५.३८ टक्के

पुणे - ६.६१ टक्के

रावेर - ७.१४ टक्के

शिर्डी -६.८३ टक्के

 

 

पुणे लोकसभा मतदानाची सकाळी नऊ वाजेपर्यंतची एकूण टक्केवारी 6.61%

कसबा पेठ विधानसभा

6 पूर्णांक 93%

कोथरूड 7 पूर्णांक 59%

पर्वती 6 पूर्णांक 99 %

पुणे कॅन्टोन्मेंट 5 पूर्णांक 69 टक्के

शिवाजीनगर 6 पुर्णांक 46%

वडगाव शेरी 5 पूर्णांक 90%

पुणे, मावळ, शिरूर मध्ये पहिल्या दोन तासात मोठे मतदान

शिरूर मध्ये ४.९७. टक्के मतदान तर

पुण्यात ६.६१ टक्के मतदान

मावळात ५.३८ टक्के मतदान

 

पुण्यात ईव्हीएम पडले बंद मतदान खोळंबले

 

पुण्यातील टिंगरे नगर बूथ क्रमांक १३२, १३३ येथे आज सकाळी मतदान सुरू झाल्यावर ईव्हीएममशीन बंद पडले. हे मशीन तब्बल १ तास बंद होते. यामुळे या मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. येथे आलेल्या मतदारांनी रोष व्यक्त केला.

हे दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात

उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, बेगुसरायमधून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग, उजयरपूरमधून नित्यानंद राय, बहरामपूरमधून अधीर रंजन चौधरी, कृष्णनगरमधून महुआ मोईत्रा, आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा, हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेशातून कडप्पा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या वायएस शर्मिला हे दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात आपले भविष्य आजमवत आहेत. उत्तर प्रदेशात कन्नौजमध्ये अखिलेश यादव यांच्यापुढे भाजपच्या सुब्रत पाठक, उन्नावमध्ये साक्षी महाराज यांच्याविरोधात सपाच्या अन्नू टंडन, बिहारमध्ये ललन सिंह यांच्या विरोधात कुारि अनिता मुंगेर लोकसभा मतदारसंघात आमने सामने आहेत. चिराग पासवान यांच्या पक्षाच्या शांभवी चौधरी या देशातील सर्वात तरुण उमेदवार असून वयाच्या 25 वर्षी त्या काँग्रेसचे सन्नी हझारी यांच्याशी लढत आहेत.

महाराष्ट्रात हे बडे उमेदवार निवडणूक रिंगणात

महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिरुरमधून अमोल कोल्हे, मावळमधून श्रीरंग बारणे, अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित,छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

देशातील ९६ मतदार संघात होणार मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार १० राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघांमध्ये १७.७ कोटी मतदार आहेत. ते १.९२ लाख मतदान केंद्रांवर मतदान करून १ हजार ७१७ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये ८.९७ कोटी पुरुष तर ९.७३ कोटी महिला मतदार आहेत. या टप्प्यात आंध्र प्रदेशच्या १७५ विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या २८ विधानसभा जागांवरही मतदान होणार आहे. सोमवारी मतदानाच्या दिवशी उष्णतेच्या लाटेचा कोणताही अंदाज नाही आणि दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा २ अंश सेल्सिअसने कमी किंवा जास्त राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी उन्हाळ्यात मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर सावली, पिण्याचे पाणी, पंखे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिग्गजांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद

चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व २५, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील ११, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४ आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश १ जागेअवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात मोदी सरकारचे ५ मोठे मंत्री, एक माजी मुख्यमंत्री, २ क्रिकेटपटू आणि एका अभिनेत्यासह अनेक ज्येष्ठ राजकारण्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तेथे भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षासोबत युती केली आहे. तेलंगणातील हैदराबादमधून भाजपच्या माधवी लता, बिहारच्या बेगुसरायमधून गिरीराज सिंह, उजियारपूरमधून गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, हैदराबादमधून एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमधून गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी, समाजवादीमधून अखिलेश मिश्रा, बेगुसरायमधून भाजपचे उमेदवार आहेत. यादव, माजी जेडीयू अध्यक्ष राजीव रंजन सिंग उर्फ ​​लालन सिंग, झारखंडमधील खुंटी येथून अर्जुन मुंडा, पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा, बहरामपूरचे अधीर रंजन चौधरी आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्यासह अनेक दिग्गजांचे मत कन्नौजमधून पक्षाने जिंकले आहे. ठरवले जाईल.

संसदेच्या ९६ जागांपैकी ६४ जागा सर्वसाधारण गटातील

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार, २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील २८३ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. चौथ्या टप्प्यातील ९६ लोकसभा जागांपैकी ६४ सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत; अनुसूचित जमाती-१२; अनुसूचित जाती प्रवर्गाच्या २० जागा आहेत. आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ जागांपैकी १३९ जागा सर्वसाधारण गटातील आहेत; अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी ७ जागा आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २९ जागा आहेत. त्याचप्रमाणे, ओडिशातील विधानसभेच्या २८ जागांसाठी उद्या मतदान होत आहे, त्यापैकी ११ सर्वसाधारण गटातील आहेत; अनुसूचित जमातीच्या १४ आणि अनुसूचित जातीच्या तीन जागा आहेत.

१९ लाखांहून अधिक मतदान अधिकारी तैनात

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतदान आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी चौथ्या टप्प्यात तीन राज्यांमध्ये (आंध्र प्रदेश-२, झारखंड- १०८; ओडिशा १२) १२२ हवाई उड्डाणे चालवण्यात आली. या टप्प्यात, १९ लाखांहून अधिक मतदान अधिकारी १.९२ लाख मतदान केंद्रांवर १७.७ कोटी मतदारांची मतदान प्रक्रिया राबवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यासाठी ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे १२.४९ लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार आणि १९.९९ लाख अपंग मतदार आहेत, ज्यांना त्यांच्या घरच्या आरामात मतदान करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे. पर्यायी HoS मतदान वैशिष्ट्याला आधीच खूप प्रशंसा आणि प्रतिक्रिया मिळत आहेत. या टप्प्यातील निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी आयोगाने ३६४ निरीक्षक (१२६ सामान्य निरीक्षक, ७० पोलीस निरीक्षक, १६८ खर्च निरीक्षक) तैनात केले आहेत. याव्यतिरिक्त, काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या