मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024: उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024: उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता

May 20, 2024 11:16 AM IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात मतदान होत आहे.

उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Thane Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात आज मतदान होत आहे, ज्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्तन, पाली, डोंगरी, भट्टे बंदर आणि चौक परिसरात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांसाठी मासेमारी हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे. किनाऱ्यावरील गावांतील लोकसंख्या २१००० च्या आसपास आहे, जे ठाणे (२५) संसदीय विभागांतर्गत येतात. त्यापैकी ५२ टक्के महिला मतदार आहेत. यातील ३० टक्के खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्या आहेत.

मच्छिमारांना मतदान करण्याचे आवाहन

“आम्ही मच्छिमारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. मासेमारीसाठी मोठ्या संख्येने बोटी समुद्रात गेल्या असल्या, तरी आम्हाला आशा आहे की त्यांच्यापैकी बहुतेक जण मतदानासाठी वेळेत परततील.” मासेमारी समुदायाचे नेते बर्नार्ड डिमेलो म्हणाले आहेत.

डहाणूतील वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन

निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या विस्तृत मोहिमेव्यतिरिक्त, धार्मिक संस्थांसह आणि सामाजिक संस्था देखील त्यांच्या आसपासच्या स्थानिकांना निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रेरित करत आहेत. दरम्यान, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती- मच्छिमारांच्या संघटनेने आपल्या समुदायाला महाविकास आघाडी (MVA) उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, कारण डहाणूतील वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन देणारा हा एकमेव पक्ष आहे.

 

मच्छिमारांच्या उदरनिर्वाहावर घातक परिणाम होण्याची भिती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच पालघरमधील बोईसरच्या भेटीदरम्यान इंडिया आघाडी सत्तेत आल्यास प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले. मासेमारी समुदाय वाढवण बंदर प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहे, कारण त्यांच्या उदरनिर्वाहावर घातक परिणाम होण्याची त्यांनी भिती व्यक्त केली.

WhatsApp channel
विभाग