मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात राज्यात ५४.३३ तर देशात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; मतदानाचा टक्का घटला

Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात राज्यात ५४.३३ तर देशात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; मतदानाचा टक्का घटला

May 21, 2024 07:54 AM IST

Lok Sabha Polls Phase 5 : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी ४९ मतदार संघात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही ५९ टक्के नोंदवल्या गेली. तर राज्यात सर्वात कमी ५४.३३ टक्के मतदानाची नोंद झाली.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी ४९ मतदार संघात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही ५९ टक्के नोंदवल्या गेली. तर राज्यात सर्वात कमी ५४.३३ टक्के मतदानाची नोंद झाली.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी ४९ मतदार संघात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही ५९ टक्के नोंदवल्या गेली. तर राज्यात सर्वात कमी ५४.३३ टक्के मतदानाची नोंद झाली. (PTI)

Lok Sabha Polls Phase 5 : देशात सोमवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ५९.०६ टक्के मतदान झाले. तर राज्यात सर्वाधिक कमी ५४.३३ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. काही तुरळक ठिकाणी गोंधळाच्या घटना वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत झाले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल फरार! तपास पथक शोधात

देशातील आठ राज्यांतील ४९ मतदारसंघात सरासरी ६०.३९ टक्के मतदानाची नोंद झाली. चौथ्या टप्प्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६.५६ टक्के मतदान झाले. बंगालनंतर लडाखमध्ये सर्वाधिक मतदान झाले. कलम ३७० हटविल्यानंतर स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झालेल्या लडाखमध्ये ६९.६२ टक्के मतदानाची नोंद झाली. पाचव्या टप्प्याचे मतदान झालेल्या अनेक मतदारसंघात सोमवारी तापमान अधिक होते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये उष्णतेची लाट होती. तर महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत देखील तापमान जास्त होते. त्यामुळे याचा परिमाण मतदानावर झालेला पाहायला मिळाला.

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट! हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, राज्यात पावसाचा इशारा

महाराष्ट्रात सुमारे ५४.३३ तर बिहारमध्ये ५२.७८ टक्के, जम्मू-काश्मीर ५४.२१ टक्के, झारखंड ६३.०६ टक्के, ओदिशा ६२.२३ टक्के, उत्तर प्रदेश ५७.७९ टक्के आणि लडाख ६८.४७ टक्के मतदानाची नोंद झाली. देशातील ४९ मतदार संघात रात्री १० वाजता आलेल्या अकडेवाडीनुसार ५९.०६ टक्के मतदान झाले.

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

पाचव्या टप्प्यात ४९ मतदार संघात मतदान झाल्यावर आतापर्यंत २३ राज्ये व केंद्र शासित प्रदेशातील ३७९ मतदारसंघांतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या टप्प्यात आठ कोटी ९५ लाख मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यात ४ कोटी २६ लाख महिला आणि ५,४०९ तृतीय पंथीयांचा समावेश होता. मतदानासाठी ९४,७३२ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.

पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार

पश्चिम बंगालमधील काही मतदार संघात हिंसचारांच्या घटना घडल्या. येथील सात मतदारसंघांमध्ये बराकपूर, बोनगाव आणि आरामबाग येथे तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्ते यांच्यात वाद झाले तर काही ठिकाणी हाणामारीच्या घटना देखील घडल्या. देशभरात तब्बल १,०३६ गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. काही ठिकाणी मतदान यंत्रांत बिघाड देखील झाले.

WhatsApp channel