J P Nadda On Rss : वाजपेयींच्या काळात भाजपला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती. कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. मात्र आज आमचा पक्ष मोठा झाला आहे. तसेच पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाला आहे. भाजप संपूर्ण पक्ष स्वबळावर चालवतो, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे, असेही नड्डा म्हणाले. राष्ट्रीय स्वयंम सेवक संघावर त्यांनी केलेल्या या व्यक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वरील वक्तव्य केले. जे. पी. नड्डा यांना वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले.
जे पी नड्डा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वाजपेयींच्या काळात पक्षाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. ते म्हणाले, "सुरुवातीला आमची ताकद कमी होती. मात्र, पक्षाची ताकद आता वाढली आहे. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो. हाच फरक आहे. पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत.
जे. पी. नड्डा म्हणाले, आरएसएस ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे आरएसएस वैचारिकपणे काम करत आहे. आम्ही आमचा कारभार आमच्या पद्धतीने हाताळतो. आणि हेच राजकीय पक्षांनी केले पाहिजे," असेही ते म्हणाले.
जेपी नड्डा पुढे म्हणाले की, मथुरा आणि वाराणसीच्या वादग्रस्त जागेवर मंदिरे बांधण्याची भाजपची कोणतीही योजना नाही. "भाजपकडे अशी कुठलीही कल्पना, योजना किंवा पक्षाची इच्छा नाही. त्यावरही चर्चा झालेली नाही.
राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाची स्थापना ही २७ सप्टेंबर १९२५ रोजी झाली होती. संघ हा भाजपचा वैचारिक गुरु राहिला आहेत. यामुळे भाजपच्या स्थापणे पासून ते सक्षम पक्ष होऊ पर्यंत संघाच्या अनेक दिग्गजांची मोठी मदत झाल्याचे मानले जाते. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते संघाचे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत. मोहन भागवत संघाचे सरसंघचालक आहेत.
संबंधित बातम्या