मराठी बातम्या  /  निवडणुका  /  CSDS Lokniti Prepoll Survey: देशात २३ टक्के महागाई तर २७ टक्के बेरोजगारांची वणवण; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उजेडात

CSDS Lokniti Prepoll Survey: देशात २३ टक्के महागाई तर २७ टक्के बेरोजगारांची वणवण; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उजेडात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 13, 2024 12:08 PM IST

CSDS Lokniti Prepoll Survey : देशात महागाई आणि बेरोजगारी हा गंभीर प्रश्न असल्याचे एका अहवलातून आढळून आले आहे. हा मुद्दा निवडणुकीत ग्राह्य धरला तर मोदी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर हिंदुत्व आणि राम मंदिर यांना २ टक्के आणि ८ टक्के नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

देशात २३ टक्के महागाई तर २७ टक्के बेरोजगरांची वणवण! सर्वेक्षणात पुढे आणि धक्कादायक माहिती
देशात २३ टक्के महागाई तर २७ टक्के बेरोजगरांची वणवण! सर्वेक्षणात पुढे आणि धक्कादायक माहिती

CSDS Lokniti Prepoll Survey : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत याने मुद्दे चर्चिले जात आहेत. यावरून मतदारांना आकर्षित देखील केले जात आहे. मात्र, या निवडणुकीत बेरोजगारी आणि महागाई हे कळीचे मुद्दे असून यानंतर विकास, हिंदुत्व आणि राम मंदिर या सारख्या मुद्यांना महत्व दिले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. जर बेरोजगारी आणि महागाईया मुद्यावरून जर नागरिकांनी मत देतांना विचार केला तर भाजप अडचणीत येऊ शकते. तर विकास या मुद्यावरून भाजपला फायदा होऊ शकतो तर हिंदुत्वमुळे २ टक्के तर राम मंदिर मुद्यामुळे ८ टक्के फायदा होऊ शकतो असे या एक सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

"छत्रपतींची गादी महाराष्ट्राच्या काळजातला विषय", गादीचा अपमान केल्याने किरण माने यांनी केली संतापजनक पोस्ट

देशातील तरुण लोकसंख्येवर बेरोजगारीचा लक्षणीय परिणाम होत आहे, असल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती पुढे आली आहे. सीएसडीएस लोकनीतीने या बाबत सर्वेक्षण केले असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई व विकास हे तीन मुद्दे महत्वाचे आणि आव्हान देणारे ठरणार आहेत. बेरोजगारी व महागाई सत्ताधारी भाजपला छळणार आहेत. या बाबत 'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वेक्षणात नागरिकांनी 'विकास' हा मुद्दा महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. या साठी ते भाजपला मत देऊ शकतात. तर ग्रामीण भागातील नागरिक बेरोजगारी व महागाईचा मुद्दा मोठा आणि भीषण असल्याचे म्हणत आहेत. सीएसडीएस-लोकनीतीच्या सर्वेक्षणात २ टक्के हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्दा ८ टक्के महत्वाचा राहील असे म्हटले आहे.

zombie drug : झॉम्बी ड्रग्सच्या आहारी 'या' देशातील तरुणाई! कबरी खोदून हाडांचा नशेसाठी वापर! सरकारनं लागू केली आणीबाणी

बेरोजगारी वाढिली तरुणांना नोकऱ्या मिळेना

देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चालली आहे. बेरोजगारी ही गेल्या विधानसभा निवडणुकीत महत्वाचा विषय होता. अनेक तरुण नोकरीसाठी भटकंती करत असून त्यांना मनासारखे काम मिळत नसल्याचे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात पुढे आले आहे. या अहवालानुसार देशात २०२२मध्ये लोकसंखेच्या तुलनेत ८२.९ टक्के तरुणांचा बेरोजगारीत वाटा होता. सर्वेक्षणात तरुणांनी असे म्हाळते आहे की गेल्या ५ वर्षात काम मिळवणे कठीण झाले आहे. फक्त १२ लोकांनी नोकरी मिळवणे सोपे असल्याचे म्हटले आहे.

Pune cyber crime : मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख पाडली महागात! इंजिनियर तरुणीला ४० लाखांनी गंडवले

देशात हा महत्वाचा मुद्दा असतांना मात्र, या कडे दुर्लक्ष करून मोदी सरकारणे प्रचारात हा मुद्दा दुर्लक्षित केला आहे. या सोबत विकास हा मुद्दा देखील महत्वाचा आहे. सर्वेक्षणात १० पैकी २ मतदारांना गेल्या पाच वर्षांत देशात विकास झाला नसल्याचे वाटते. तर ३२ टक्के मतदारांना विकास केवळ श्रीमंतांसाठी' झाला असे वाटत आहे.

विकास उपक्रमांबाबत शंका

केवळ ८ टक्के नागरिकांनी भ्रष्टाचार व अयोध्येतील राम मंदिराबाबत बोलले आहे. मोदी सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार वाढला असल्याचे बहुतांश नागरिकांचे मत आहे. तर शेतकाऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीच्या हमीबाबत सुरू असलेल्या आंदोलनावरून देखील नाराजी आहे. ६३ टक्के शेतकऱ्यां आंदोलनाच्या मागण्या खऱ्या असल्याचे म्हटले आहे. तर ११ टक्के शेतकऱ्यांनी हे आंदोलन म्हणजे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

WhatsApp channel