PM Modi: संसदेतील सहकाऱ्याने १०१ शिव्या दिल्या! मौत का सौदागर, 'गंदी नाली का कीडा म्हटलं, आता मी 'गाली प्रूफ'; पीएम मोदी
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi: संसदेतील सहकाऱ्याने १०१ शिव्या दिल्या! मौत का सौदागर, 'गंदी नाली का कीडा म्हटलं, आता मी 'गाली प्रूफ'; पीएम मोदी

PM Modi: संसदेतील सहकाऱ्याने १०१ शिव्या दिल्या! मौत का सौदागर, 'गंदी नाली का कीडा म्हटलं, आता मी 'गाली प्रूफ'; पीएम मोदी

May 28, 2024 12:15 PM IST

PM Modi : विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांनी मला मौत का सौदगर, गंदी नाली का किडा म्हटले. मात्र, कुणी काही म्हटले तरी मी आता गाली प्रूफ झाल्याचे मोदी म्हणाले.

संसदेतील सहकाऱ्याने १०१ शिव्या दिल्या! मौत का सौदागर, 'गंदी नाली का कीडा म्हटलं, आता मी 'गाली प्रूफ'; पीएम मोदी
संसदेतील सहकाऱ्याने १०१ शिव्या दिल्या! मौत का सौदागर, 'गंदी नाली का कीडा म्हटलं, आता मी 'गाली प्रूफ'; पीएम मोदी

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधक माझ्यावर गेल्या २४ वर्षांपासून शिवीगाळ करत असून आता मी 'गाली प्रूफ' झालो आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वैयक्तिक टीकांचाही समाचार घेतला. मोदी म्हणाले, मला कुणी मौत का सौदागर म्हटले तर कुणी गंदी नाली का किडा. संसदेतील माझ्याएका सहकाऱ्याने तर माझ्याबद्दल १०१ अपशब्द बोलले होते. त्यामुळे निवडणुका असो वा नसो, हे लोक (विरोधक) मानतात की, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते वैतागले आहेत. सातत्यानं अपशब्द वापरणं त्यांच्या स्वभाव बनला आहे."

Kasara Accident : कसाऱ्यातील वाशाळा पुलाजवळ भरधाव डंपरनं तीन मजुरांना उडवलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी

आरक्षणाच्या मुद्द्यावर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, त्यांनी रातोरात मुस्लिमांच्या सर्व जातींना ओबीसी बनवले. निवडणूक प्रचारादरम्यान एवढी मोठी फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले असतानाच याविरोधात उच्च न्यायालयाचा निकाल आला. आता ते न्यायव्यवस्थेलाही शिव्या देत आहेत. आम्ही न्यायालयाचे म्हणणे ऐकून घेणार नाही, असेही ते सांगत आहेत. ही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही.

Mumbai Dharavi Fire: मुंबईच्या धारावी परिसरात मोठी आग, सहा जण होरपळले; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

ईडी, सीबीआयवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ईडी आणि सीबीआयच्या वापराबाबत विरोधकांच्या आरोपांबाबत पंतप्रधानांना विचारले असता ते म्हणाले, विरोधकांनी भाजपने कचरा निवडला अशी टीका केली. हा कचरा घेऊन तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात. सरकारला कोणते प्रश्न विचारावेत, यावर माध्यमांनी संशोधन करावे. विरोधकांचा कचरा घेऊन तुम्ही आमच्याकडे या. मी कचऱ्याचे कंपोस्टखत करून त्याचा वापर देशासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी करेन.

पंतप्रधान म्हणाले, गावच्या सरपंचालाही चेकबुकवर सही करण्याचा अधिकार आहे. पण देशाच्या पंतप्रधानांना नाही. इतके ज्ञान ही या लोकांना नाही. देशाच्या पंतप्रधानांना असा कोणताही अधिकार नाही. मोदी सरकार भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबणार आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात ३४ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. गेल्या १० वर्षात ईडीने २२०० कोटी रुपये जप्त केले आहेत. ज्याने देशात २०० कोटी परत आणले आहेत. त्याचा आदर किंवा अपमान केला पाहिजे. मात्र, ज्यांच्या खिशातून २२०० कोटी गेले. ते आता ओरडत आहे. याचा अर्थ चोर पकडला गेला तर त्याच्या चोरीत सहभागी असलेल्या व्यक्ति देखील ओरडतो असे देखील मोदी म्हणाले.

Whats_app_banner