Abhijit Gangopadhyay : आज राजीनामा दिला, दोन दिवसांत भाजपमध्ये जाणार; हायकोर्टाचे जज निवडणूक लढणार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Abhijit Gangopadhyay : आज राजीनामा दिला, दोन दिवसांत भाजपमध्ये जाणार; हायकोर्टाचे जज निवडणूक लढणार

Abhijit Gangopadhyay : आज राजीनामा दिला, दोन दिवसांत भाजपमध्ये जाणार; हायकोर्टाचे जज निवडणूक लढणार

Updated Mar 05, 2024 03:42 PM IST

Abhijit Gangopadhyay Resignation : कोलकाता उच्च न्यायालयातील (Calcutta HC) न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा देत भाजप (BJP) प्रवेशाची घोषणा केली आहे.

आज राजीनामा दिला, गुरुवारी भाजपमध्ये जाणार; हायकोर्टाचे जज निवडणूक लढणार
आज राजीनामा दिला, गुरुवारी भाजपमध्ये जाणार; हायकोर्टाचे जज निवडणूक लढणार

Abhijit Gangopadhyay Resignation : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला असून उमेदवार निश्चितीची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत इच्छुकांनी पुढची पावलं टाकायला सुरुवात केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे त्यापैकी एक आहेत.

अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते गुरुवार, ७ मार्च रोजी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर कोलकाता इथं त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. येत्या ७ मार्च रोजी मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये केवळ भाजपच तृणमूल काँग्रेसशी (Trinamool Congress) लढू शकतो, असंही ते म्हणाले.

न्यायमूर्ती गंगोपाध्याय हे आज सकाळी उच्च न्यायालयात त्यांच्या चेंबरमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपले राजीनामा पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आणि त्याची प्रत सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टीएस शिवगनम यांना पाठवली.

राजीनाम्याची घोषणा गंगोपाध्याय यांनी रविवारीच केली होती. गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या सुनावणीशी संबंधित होते. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात ते निवृत्त होणार होते. राजीनामा जाहीर करताना त्यांनी पश्चिम बंगालमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. तेव्हाच ते भाजपच्या वाटेवर असल्याचं स्पष्ट झालं होतं.

तमलूक मतदारसंघातून निवडणूक लढणार?

गंगोपाध्याय हे तमलूक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. तमलूक हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला बनला आहे. २००९ पासून ही जागा तृणमूल काँग्रेस जिंकत आहे. यावेळी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडायचा भाजपचा प्रयत्न आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळवला होता. अधिकारी हे तेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये होते. अधिकारी यांनी पक्ष सोडल्यानंतर २०१६ साली झालेल्या पोटनिवडणुकीतही तृणमूलनंच बाजी मारली होती. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या