mohit kamboj on Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचे सरकार असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी ट्विट करत केला आहे. या कटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक बड्या महिला नेता, आयपीएस अधिकारी व एका आमदाराचा या कटात समावेश असल्याचा दावाही कंबोज यांनी केला आहे. या बाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत विरोध आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता मोहित कंबोज यांनी ट्विट करत शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरे गट यांना लक्ष्य केले आहे.
मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटले आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता. या कटासंदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे. राष्ट्रवादीची कॉँग्रेसची एक बडी महिला नेता, एक माजी आयपीएस अधिकारी आणि एका माजी पत्रकराचा समावेश आहे. या संदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असून या साठी तयार राहा म्हणत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र राष्ट्रवादी कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजपचे नेते मोहित कंबोज हे त्यांच्या या ट्विटमुळे सध्या चर्चेत आले आहे. कंबोज यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ते नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात बारामती येथे ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मंतदानाच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. बारामती मतदार संघात आज अजित पावर आणि शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. या सभेत ते कुणाला लक्ष करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.