मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Baramati Lok Sabha: बारामतीच्या EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही ४५ मिनिटे बंद! अधिकारी म्हणाले, कॅमेरे सुरु पण..

Baramati Lok Sabha: बारामतीच्या EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही ४५ मिनिटे बंद! अधिकारी म्हणाले, कॅमेरे सुरु पण..

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 13, 2024 03:06 PM IST

Baramati Lok Sabha news : बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक ७ मे रोजी झाले असून येथील ईव्हीएम ठेवण्यात आलेले स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही तब्बल ४५ मिनिटे बंद आल्याची घटना उघकडीस आली आहे. या बाबत शरद पवार गटाचा गंभीर आरोप केले असून नवा वाद सुरू झाला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान झालेले ईव्हीएम ज्या गोदामत ठेवण्यात आले होते, त्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही तब्बल ४५ मिनिटे बंद आल्याची घटना उघकडीस आली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान झालेले ईव्हीएम ज्या गोदामत ठेवण्यात आले होते, त्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही तब्बल ४५ मिनिटे बंद आल्याची घटना उघकडीस आली आहे.

Baramati Lok Sabha news : राज्यात एकीकडे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असतांना बारामती येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल आहे. बारामती लोकसभा मतदान केंद्रातील मतदान हे ७ मे रोजी पार पडले. यानंतर बारामती  मतदार संघातील सर्व ईव्हीएम मशीन कोरेगाव पार्क येथील  एका गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, या स्ट्रॉंग रूमचे सीटीटीव्ही आज सकाळी तब्बल ४५ मिनिटे बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. स्ट्राँग रुमच्या बाहेर मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाले होते. त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Election : पुण्यात चाललंय काय! बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान; तर जिवंत मतदारांना दाखवले मृत!

बारामती लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मतदान झालयार एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे. मात्र, आज सकाळी या स्ट्रॉंगरूम बाहेरील मॉनिटर ही अचानक बंद झाले. तब्बल ४५ मिनिटे हे मॉनिटर बंद असल्याने येथे काही तरी काळेबेरे होत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे. त्यांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या बाबत माहिती दिली. त्यांनी शेयर केलेल्या व्हिडिओत या ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज सकाळी १०.२५ पासून बंद असल्याचे सांगितले आहे. याचे कारण काय असून काही तरी गौडबंगाल असल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. त्यांनी या संदर्भात या विभागाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. तसेच या बाबत कोणताही प्रतिसाद त्यांनी दिला नाही. तर या बाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला असता आम्हाला गोदामापर्यंत जाऊ दिले गेले नसल्याचे खाबीया यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

गैर प्रकार झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप

तब्बल ४५ मिनिटे या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज बंद होते. यानंतर पुन्हा यातील दृश हे मॉनिटरवर दिसायला लागले. दरम्यान, या काळात गैरप्रकार झाला असल्याची शंका शंका शरद पवार गटाने वहाकट केली असून या बाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

निवडणूक अधिकारी म्हणतात..

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत. येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सकाळी १०.२५च्या दरम्यान काही वेळासाठी बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद नव्हते असा दावा द्विवेदी यांनी केला. सीसीटीव्हीचे दृश्ये ज्या स्क्रिनवर दिसते, ती स्क्रिन काही वेळासाठी झाली होती. या मॉनिटरच्या वायर खराब झाला होता. या दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रीकरण सुरूच होते असा खुलासा त्यांनी केला आहे.

WhatsApp channel