Arvind Kejriwal big attack on pm narendra modi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेऊन जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुढील वर्षी पंतप्रधान निवृत्त होत असल्याने भाजप जिंकल्यास पुढचा पंतप्रधान कोण असेल, असा सवाल देखील त्यांनी केला.
केजरिवाल म्हणले, “पंतप्रधान मोदी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपाची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपामधीलही मोठे नेते राजकीय मंचावर दिसणार नाहीत. लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल, तर सप्टेंबर २०२५ नंतर अमित शाह देशाचे पंतप्रधान होतील, असा खळबळ जनक दावा केजरीवाल यांनी केला.
केजरीवाल म्हणाले, भाजप इंडिया आघाडीला विचारतात की तुमचा पंतप्रधान कोण होणार? मला भाजपला विचारायचे आहे की, त्यांचा पंतप्रधान कोण होणार? १७ डिसेंबरपासून पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल तो निवृत्त होईल. त्यांनी आधी आडवाणींना नंतर मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा या सारख्या अनेकांना निवृत्त केले. त्यामुळे आता मोदीं यांच्या निवृत्तीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपानेच सांगावे की, त्यांचा पंतप्रधान कोण असणार?”, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला. ही भाजपची राजवट आहे. येथे अनेक नेते निवृत्त झाले आहेत. अशा स्थितीत आता अमित शहा यांना पुढील पंतप्रधान बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. सीएम केजरीवाल म्हणाले, पंतप्रधान मोदींची हमी कोण पूर्ण करणार? मला मोदीजींना विचारायचे आहे की अमित शहा हे मोदींची हमी पूर्ण करतील का?
केजरिवाल म्हणाले, मोदी आणि अमित शहा योगींना हटवून अमित शहांना पंतप्रधान बनवतील. म्हणूनच तुम्ही मोदींना नाही तर अमित शहांना मत देत आहात. भाजपने मध्य प्रदेश निवडणुकीत विजयी झालेल्या शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री केले नाही, त्यांचे राजकारण संपवले. वसुंधरा राजे, खट्टर साहेब, रमण सिंह यांचे राजकारण मोदी शहा यांनी संपवले, आता पुढचे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत. त्यांनी ही निवडणूक जिंकली तर दोन महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बदलले जातील. ही हुकूमशाही आहे.
केजरिवाल म्हणाले, मोदीजींना माहित आहे की आप देशाला पुढे घेऊन जाईल. म्हणूनच आम्हाला त्यांना संपवायचे आहे. ते काम करत नाहीत, काम करणाऱ्यांनाच उद्ध्वस्त करण्याचे कट कारस्थान भाजप करत आहे. भाजपने मला खूप छळले आणि तुरुंगात पाठवले. ते म्हणतात की ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. मात्र, त्यांचाच पक्ष भ्रष्टाचारात सर्वाधिक गुंतलेला आहे.
केजरिवाल म्हणाले, मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की, तुम्हाला भ्रष्टाचाराशी लढायचे असेल तर माझ्याकडून शिका. मी माझ्या मंत्र्यावर कारवाई केली. पंजाबमध्ये आमच्या सरकारमधील एका मंत्र्याला तुरुंगात पाठवले. ही भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आहे. माझ्यावर खोटे आरोप करून मला अटक करण्यात आली. आम्ही मुख्यमंत्र्यांना अटक करू शकलो तर कोणालाही अटक करू शकतो, असा संदेश त्यांनी देशाला दिला आहे.
केजरीवाल म्हणाले, हे लोक वन लीडर वन नेशन मिशनवर काम करत आहेत. हे अभियान दोन स्तरांवर चालवले जात आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात पाठवणार आणि भाजपच्या बड्या नेत्यांना मार्गातून हटवणार. भाजप अनेक विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवतील आणि भाजप नेत्यांना संपवतील. आपला देश महान आहे. लोकशाही नष्ट करणाऱ्यांना देश उद्ध्वस्त करेल. मी त्याविरुद्ध लढत आहे. या साठी मला १४० कोटी लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे.
संबंधित बातम्या