Pune Election : पुण्यात चाललंय काय! बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान; तर जिवंत मतदारांना दाखवले मृत!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Pune Election : पुण्यात चाललंय काय! बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान; तर जिवंत मतदारांना दाखवले मृत!

Pune Election : पुण्यात चाललंय काय! बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान; तर जिवंत मतदारांना दाखवले मृत!

May 13, 2024 02:15 PM IST

Bogus Voting in Name of Pune Congress President Arvind Shinde : एका बड्या काँग्रसनेत्याच्या नावाने बोगस मतदान करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे.

काँग्रसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने बोगस मतदान  करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.
काँग्रसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने बोगस मतदान करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.

Pune Election news : पुण्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दुपारी १ वाजेपर्यंत २६.४८ टक्के मतदान झाले आहे. या मतदानादरम्यान, अनेक गैर प्रकार देखील उघडकीस आले आहेत. एका बड्या काँग्रसनेत्याच्या नावाने बोगस मतदान करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे. तर काही ठिकाणी जीवंत मतदारांना मृत दाखवण्यात आल्याने काही नागरिकांना मतदान करता आले नाही.

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचा हक्क बजवण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे निवडणूक केंद्रावर गेले होते. मात्र त्यांनी मतदान न करताच त्यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे त्यांना धक्का बसला आहे. पुण्यातील बड्या नेत्यासोबत हा प्रकार घडला असल्याने अनेकांनी बोगस मतदान केले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी चिंता व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, गुणपत्रिका 'अशी' पाहा ऑनलाइन!

शिरूरमध्येही बोगस मतदानाचा प्रकार उघड

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन स्वाक्षरी केली. प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान झाल्याचे उघड केले आहे राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयामधील मतदान केंद्रात हा प्रकार घडला आहे.

जिवंत मतदारांच्या नोंदी झाल्या मृत !

पुणे लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी आवश्यक पुरावे घेऊन उत्साहाने गेलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव मृत्यू असे नोंदल्याचे आढळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. युवक क्रांती दल, भारत जोडो अभियान चे कार्यकर्ते संदिप बर्वे यांना आणि काँग्रेस च्या बुथवरील कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आला. मतदान केंद्र क्र.१८८,महात्मा फुले पेठ ,शाळा नंबर ९५,खोली नंबर २ येथे मतदान असलेल्या ५ जणांच्या बाबतीत मयत नोंदी असल्याचे दुपारी १२ वाजेपर्यंत आढळले. नजीर करीम शेख(मतदार क्र.८९६),राजा मोहन गावंडे(७५८),हसन शेखलाल शेख(७७६),विजय तुकाराम कोंढरे (१११),फकीर अहमद शेख (३०४) या मतदारांच्या नावापुढे मयत अशी नोंद दिसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

Whats_app_banner