उत्तर प्रदेशमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या रॅलीत समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे रॅलीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आधी ले फूलपुर (Phulpur) नंतर संतकबीरनगर (Santkabirnagar) आणि आता आजगमगड (Azamgarh) मध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अखिलेश यांच्या रॅलीत जमाव अनियंत्रित झाला, यामुळे रॅलीत गोंधळ निर्माण झाला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आझमगड जिल्ह्यातील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी अखिलेश यादव याची सभा होती. येथे सहाव्या टप्प्यात म्हणजे २५ मे रोजी मतदान होणार आहे.
लालगंज लोकसभा मतदारसंघात अखिलेश यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली.सभेतच दगडफेक आणि एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. या गोंधळात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रसाद सरोज यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर अखिलेश यादव पोहचले तेव्हा समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून अखिलेश यांच्या दिशेने पळत सुटले. यावेळी कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी दगड आणि खुर्च्या फेकल्या गेल्या.
याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये दिसते की, स्टेजकडे जात असताना सपा कार्यकर्त्यांना मागे हटवले गेले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली व कार्यकर्ते एकमेकांवर कोसळले. यावेळी ज्या स्टँडवर लाउड स्पीकर लावले होते, तेही कोसळले. इतकेच नाही तर पुढच्या कार्यकर्त्यांना मागे हटवले गेल्यानंतर मागील कार्यकर्ते सैरावैरा पळत सुटले.
याआधी प्रयागराजमधील फूलपूर येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या संयुक्त सभेतही असेच दृश्य पाहायला मिळाले. येथेही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने दोन्ही नेते भाषण न करताच तेथून निघून गेले. दरम्यान दोन्ही नेत्यांच्या रॅली स्थळावर संवाद साधतानाचा व्हिडिओ जारी केला होता.
अखिलेश यादव यांच्या संतकबीरनगरमध्येही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी कार्यकर्ते बॅरीकेडिंग तोडून स्टेजकडे पळत सुटले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला नियंत्रित केले होते. संतकबीरनगरच्या रॅलीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये दिसते की, मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा कठडे तोडले व सपा प्रमुख अखिलेश यांच्या कारपर्यंत पोहोचले. यावेळी त्यांनी अखिलेश यांच्यासोबत सेल्फीही घेतली.
संबंधित बातम्या