मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Shrinivas Pawar: चार जूननंतर अजित पवारांना मिश्या काढाव्या लागतील; श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा अजित पवारांना सूनावलं

Shrinivas Pawar: चार जूननंतर अजित पवारांना मिश्या काढाव्या लागतील; श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा अजित पवारांना सूनावलं

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 05, 2024 01:24 PM IST

Baramati Loksabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि ७) मतदान होत आहे. आज अजित पावर आणि शरद पवार बारामती मतदार संघात सभा घेणार आहेत. त्यापूर्वी अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनी पुन्हा अजित पावर यांच्यावर टीका केली आहे.

चार जून नंतर अजित पवारांना मिश्या काढाव्या लागतील; श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा अजित पवारांना सूनावलं
चार जून नंतर अजित पवारांना मिश्या काढाव्या लागतील; श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा अजित पवारांना सूनावलं

shrinivas pawar On Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात मंगळवारी ७ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. दरम्यान आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते मतदार संघात सभा घेणार आहेत. अशातच अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागणार आहेत, अशी टीका श्रीनिवास पावर यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत झालेल्या एका सभेत सुप्रिया सुळे व त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यावरून श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना सुनावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Beed Crime : बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात फिरत असलेला एकही जण ४ जूननंतर दिसणार नाही. जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार श्रीनिवास पवार यांनी घेतला आहे. श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप देखील केला आहे. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज आहे. माझा मुलगा मला जेवढा प्रिय आहे तेवढेच दीरही प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले असून या संघर्षामुळे त्या अजित पवार यांचे बारामती येथील घर सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजितदादांच्या भूमिकेमुळे त्यांची साथ सोडली असल्याचे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

अतिटतीची निवडणूक

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला आहे. या साठि मंगळवारी ७ मे रोजी मतदान होत आहे. नणंद विरुद्ध भावजय असा सामना बारामतीत रंगणार असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. बारामतीची निवडणूक ही अजित पावर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार व अजित पवार या दोघांनीही या मतदार संघात संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द देखील या निवडणुकीत पणाला लागली आहे. येत्या ४ जूनला याचा फैसला होणार असल्याने सर्वांच्या नजरा ४ जूनला लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.

WhatsApp channel