मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ahmednagar Lok Sabha : मतदानाच्या आदल्या रात्री नगरमध्ये पैशांचा पाऊस; निलेश लंके यांचा भाजपवर आरोप; व्हिडिओ शेयर

Ahmednagar Lok Sabha : मतदानाच्या आदल्या रात्री नगरमध्ये पैशांचा पाऊस; निलेश लंके यांचा भाजपवर आरोप; व्हिडिओ शेयर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 13, 2024 08:59 AM IST

ahmednagar loksabha election news : राज्यातील ११ लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत असून नगर येथे बारामती प्रमाणे पैसेवाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतचा व्हिडिओ निलेश लंके यांनी व पक्षाने ट्विटरवर शेयर केला आहे.

नगर येथे बारामती प्रमाणे पैसेवाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतचा व्हिडिओ निलेश लंके यांनी व पक्षाने ट्विटरवर शेयर केला आहे.
नगर येथे बारामती प्रमाणे पैसेवाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतचा व्हिडिओ निलेश लंके यांनी व पक्षाने ट्विटरवर शेयर केला आहे.

ahmednagar loksabha election news : राज्यातील ११ लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी नगरमध्ये धनशक्ती सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. नगर येथे बारामती प्रमाणे पैसेवाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याकहा व्हिडिओ शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी व पक्षाने ट्विटरवर शेयर केला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजप सत्तेच्या जोरावर पैसे वाटप करून मतदान आणि निवडणूक प्रभावित करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. बारामती सारखेच अहमदनगरमध्ये रात्री भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटतानाच व्हिडीओ पुढे आला आहे. या व्हिडीओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. अहदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकें तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील ट्विटर वरुन हा व्हिडिओ शेयर करत कारवाईची मागणी केली आहे.

नीलेश लंके यांची कारवाईची मागणी

या घटनेचे तीन व्हिडिओ हे ट्विट करण्यात आले आहे. नीलेश लंके यांनी हे व्हिडिओ शेयर करत भाजपवर निशाणा साधला आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटताना व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओवर नीलेश लंके यांनी कमेन्ट केली आहे. निलेश लंके म्हणाले, बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. अहमदनगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा पाऊस पडला आहे. या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला. अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला बळी पडणार नाही. भाजपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडतना दिसत आहे. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नेमकं काय घडलं?

नीलेश लंके यांच्या करकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पैसे घेऊन जात असलेली पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांची गाडी थांबवली तसेच येथे सुरू असलेला पैसे वाटपाचा कार्यक्रम त्यांनी थांबवलं. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते कार्यकर्ते भिडले. मध्यरात्री मोठा राडा येथे झाला. यावेळी पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ काढण्यात आले. हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. तर नीलेश लंके गटाच्या काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचे आरोप राहुल यांनी शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ही घटना वडझिरे येथे घडली आहे. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली असून या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

WhatsApp channel