Lok sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडली. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली असून तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं समोर आलं आहे. आज महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात ५९.५१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया संपली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघात ५९.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.८९ टक्के तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान झालं.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६.०२ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ३६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच आंध्र प्रदेशमध्ये ६८.२० टक्के, बिहारमध्ये ५५.९२ टक्के, महाराष्ट्रात ५२.९३ टक्के झारखंडमध्ये ६४.३० टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये ६९.१६ टक्के मतदान झाले. याशिवाय ओडिशात ६४.२३ टक्के, तेलंगणात ६१. ५९ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५८.०२ टक्के मतदान झालं आहे.
जळगाव - ५३.६६ टक्के
जालना - ६८.०३ टक्के
नंदुरबार - ६७.१२ टक्के
शिरूर - ५१.६६ टक्के
अहमदनगर- ६३.७६ टक्के
औरंगाबाद - ६०.६३ टक्के
बीड - ६८.२८ टक्के
मावळ - ५२.९० टक्के
पुणे - ५१.२५ टक्के
रावेर -६३.३६ टक्के
शिर्डी - ६१.१३ टक्के
राज्यात आज अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर झाला. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक मतदार मतदान करण्यापासून वंचित राहिले. अशा केंद्रावर फेरमतदान केलं जावं,अशी मागणी केली जात आहे. अवकाळी पावसामुळे मतदानावर परिणाम झाला. यामुळे कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाकडू पत्र लिहून केली आहे. त्यात म्हटले आहे की, मावळ मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने विजेचे खांब कोलमडून पडेल. घरावरील पत्रे उडून गेले. अनेक मतदारसंघात लाईट नसल्या कारणाने २ ते ३ तास मतदार मतदान करू शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीम भागातील परिस्थितीची चौकशी करून अशा ठिकाणी फेर मतदान घेण्यात यावे.
सोमवार (१३ मे ) सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवली गेली. चौथ्या टप्प्यात एकूण १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ६ पर्यंत वाढवण्यात आली होती.
संबंधित बातम्या